शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: रक्तातील साखर वाढल्यावर कोरोनाची लस घ्यावी का ?जाणकार सांगतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 14:58 IST

1 / 8
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका डायबेटीजच्या रुग्णांना असल्याचे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्तं केलंय. बऱ्याच ठिकाणी कोरोना झाल्यानंतर रक्तातील साखर वाढल्याचेही प्रकरणं समोर आली आहेत. याशिवाय, अनेक डायबेटीक रुग्णांना कोरोनामुळे ब्लॅक फंगसचा धोकाही निर्माण झाला आहे.
2 / 8
डायबेटीज असलेल्या रुग्णांमध्ये कोरोना गंभीर परिणाम करतो, त्यामुळे डॉक्टर अशा रुग्णांना तातडीने कोरोना लस घ्यायला सांगतात. डायबेटीक रुग्णांना कोरोना किंवा ब्लॅक फंगससह इतर अनेक आजारांचा धोका असतो. अशा परिस्थिती अनेकांना प्रश्न पडत आहे की, लस तातडीने घ्यावी, का शुगर आटोक्यात आल्यानंतर घ्यावी ?
3 / 8
जाणकार सांगतात की, कोरोना लसीमुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. लस घेतल्यानंतर काही साइड इफेक्ट जाणवू शकतात, पण यामुळे रक्तातील साखर वाढत नाही.
4 / 8
एम्स भोपाळचे संचालक डॉ. सरमन सिंह यांनी सांगितल्यानुसार, ब्लड शुगर असलेल्या नागरिकांनीही लस घ्यायला हवी. व्हॅक्सीनचा आणि रक्तातील साखरेचा काहीही संबंध नाही. पण, लस घेतलेली असो किंवा नसो, ब्लड शुगरवर लक्ष्य असायला हवं.
5 / 8
व्हॅक्सीनचा आणि रक्तातील साखरेचा काहीच संबंध नसल्यामुळे जाणकार लोकांना लवकरता लवकर लस घेण्यास सांगत आहेत. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे सर्वांनीच लवकर लस घ्यायला हवी.
6 / 8
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाट जास्त भयानक होती. दुसऱ्या लाटेत संसर्ग आणि मृत्यू मोठ्या प्रमाणात झाले. आता तिसऱ्या लाटेचा शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे त्यापूर्वीच व्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेण्याचा सल्ला जाणकार देत आहेत.
7 / 8
डायबेटीजच्या रुग्णांसाठी लस अत्यावश्यक आहे. लसीचा आणि डायबेटीजचा काहीही संबंध नसल्याचं जाणाकरांनी सांगितलं आहे, परंतु डायबेटीज असलेल्या लोकांना इंजेक्शन घेतलेल्या जागेवर काही दिवस दुखू शकतं.
8 / 8
डायबेटीज असलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाचा धोका तर आहेच, पण यासोबतच इतर आजारं होण्याची शक्यताही जास्त आहे. त्यामुळेच जाणकार अशा लोकांना आपलं डायबेटीज कंट्रोल करण्याचा सल्ला देतात.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसdiabetesमधुमेह