1 / 10कोरोना व्हायरस(Coronavirus) आजारातून बरे झालेल्या रुग्णांसाठी धक्कादायक बातमी आहे. कोरोनातून बरे झालेले रुग्ण साइटोमेगालो व्हायरसच्या विळख्यात अडकल्याचं समोर आलं आहे. ताज्या आकडेवारीनुसार दिल्लीत साइटोमेगालो व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. 2 / 10दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये साइटोमेगालो व्हायरसचे ६ रुग्ण दाखल झाले आहेत. कोरोना झाल्यानंतर २०-३० दिवसांनी या रुग्णांना साइटोमेगालो व्हायरस झाल्याचं कळालं. या रुग्णांवर सध्या दिल्लीत उपचार सुरू आहेत. परंतु या आजारामुळे डॉक्टरांनी रुग्णांना काळजी घेण्याचं आवाहन केले आहे. 3 / 10सध्या कोरोना संक्रमणाची संख्या नियंत्रणात असली तरी पीटीआय रिपोर्टनुसार अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणं आढळून आली होती. तेव्हा कोरोनातून बरे होण्यासाठी या रुग्णांना स्टेरॉयड औषधं दिली. परंतु औषधाचा अतिवापर घातक ठरतो.4 / 10स्टेरॉयड औषधांच्या सेवणानं रुग्णांचा रिपोर्ट कोविड निगेटिव्ह असल्याचा येतो. परंतु त्यांच्यात साइटोमेगालो व्हायरसची(CMV) लक्षणं दिसून आली आहेत. मागील महिन्यात कोविड १९ च्या आजारानंतर ६ जणांना सीएमबी आजार झाल्याचं कळालं अशी माहिती डॉक्टरांनी दिली. 5 / 10अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर अतहर अंसारी म्हणाले की, सीएमवी आजाराची लक्षणं शरीरातील कोणत्या भागावर त्याचा परिणाम झाला आहे यावर निर्भर आहे. जर संसर्ग फुस्फुस्सांवर झाला असेल तर रुग्णाला ताप येईल. श्वास घेण्यास अडचणी येतील तसेच छातीत दुखणे, खोकला अशी समस्या उद्भवेल.6 / 10साइटोमेगालो व्हायरस(Cytomegalovirus)च्या लक्षणांचा विचार केला तर त्यात अनेक प्रकार आहेत. ताप, थकवा यासारखी गंभीर लक्षणं आहेत. यात डोळे, मेंदू अथवा शरीरातील कोणत्याही अंतर्गत भागावर नुकसान होऊ शकतं. किंवा कोणती वेगळी लक्षणंच दिसून येणार नाहीत असंही होऊ शकतं. 7 / 10अपोलो हॉस्पिटलमध्ये जे ६ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. त्यांना हाइपोक्सिया, फुस्फुस्स आणि किडनीवर सूज आल्याची समस्या जाणवली. साइटोमेगालो व्हायरस हा त्या लोकांमध्ये जास्त आढळतो जे एचआयव्ही(HIV) ग्रस्त आहे. 8 / 10CD4 काऊटं कमी होणे, कँसर निगडीत सर्जरी झाली असेल, किंवा असं कोणतं औषध घेतलं असेल ज्यामुळे इम्युनिटी कमी होईल अशांमध्ये साइटोमेगालो व्हायरस आढळतो. कोविड १९ किंवा त्यातून बरे होण्यासाठी स्टेरॉयड औषध मिळतं त्यानेही इम्युनिटी कमकुवत होण्याचा धोका असतो. 9 / 10साइटोमेगालो व्हायरस अशा लोकांच्या शरीरावर हल्ला करतं. साइटोमेगालो व्हायरस संबंधित इंफेक्शन पहिल्यापासून ८०-९० टक्के भारतीय लोकसंख्येत आढळते. परंतु इम्युनिटी मजबूत असल्याने त्याचा परिणाम अथवा लक्षणं कुठे दिसत नाहीत. परंतु इम्युनिटी कमी झाल्यास ती लक्षणं दिसतात. 10 / 10देशभरात गेल्या २४ तासांत ४५ हजार ८९२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात ८१७ जणांचा मृत्यू झाला आहे. याचसोबत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ०७ लाख ०९ हजार ५५७ वर पोहचली आहे. देशात सध्या ४ लाख ६० हजार ७०४ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे.