शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: भारताबाबत खरा ठरतोय ‘या’ वैज्ञानिकाचा दावा; जुलैपर्यंत २१ लाख कोरोना रुग्ण होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 3:19 PM

1 / 11
चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरातील अनेक देशात थैमान घातलं आहे. भारतातही कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यत भारतात २ लाख ५० हजाराहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
2 / 11
जागतिक आरोग्य संघटनेने भारतासह दक्षिण आशियाईतील देशांना अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक कोरोना व्हायरसचे शिकार बनतील अशी भीती डब्ल्यूएचओने व्यक्त केली आहे.
3 / 11
दिल्लीचे उपमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जुलैपर्यंत राजधानीत ५ लाख लोक कोरोना संक्रमित असतील असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र २३ मे रोजी मूळ भारतीय वैज्ञानिक भ्रमर मुखर्जी यांनी अशाप्रकारे देशात जुलैपर्यंत २१ लाख कोरोना संक्रमित लोक आढळतील. कोरोना रुग्णांचा वेग दर १३ दिवसांनी दुप्पट होईल असं सांगितलं होतं.
4 / 11
भारतात वाढणाऱ्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने जगात ६व्या नंबरवर आला आहे. तर आशिया खंडात भारताचा पहिला नंबर लागतो, युनिवर्सिटी ऑफ मिशिगन आणि जॉन हॉपकिन्स युनिवर्सिटी यांनी कोरोना मॉडेलचा अभ्यास करुन ही शक्यता वर्तवली होती.
5 / 11
भारतात जुलेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २१ लाख कोरोनाच्या जाळ्यात अडकतील. कोरोना विषाणू तज्त्र भ्रमर मुखर्जी यांनी भारतासाठी ही स्थिती गंभीर होऊ शकते, यापूर्वीही मुखर्जी यांनी एप्रिलमध्ये सांगितलं होतं की, मे पर्यंत भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाख होईल.
6 / 11
प्राध्यापक भ्रमर मुखर्जी म्हणतात की, भारतात अद्याप संसर्गाचे प्रमाण कमी झाले नाही, सरकारी आकडेवारीनुसार भारतात कोरोना विषाणूची लागण होणारी प्रकरणे दर १३ दिवसांनी दुप्पट होत आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाऊनशी संबंधित निर्बंध उठवणे म्हणजे अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
7 / 11
मंगळवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, दिल्ली सरकारचा अंदाज आहे की राज्यात कोरोना प्रकरणे १२ ते १३ दिवसांत दुप्पट होत आहेत, अशा परिस्थितीत भ्रमर मुखर्जी यांचे मूल्यांकन खरे असल्याचे दिसते. १५ जूनपर्यंत राजधानीत ४४ हजार रुग्ण होणे अपेक्षित आहे, दिल्लीच्या रूग्णालयात उपचारांसाठी ६ हजार बेडची आवश्यकता असेल.
8 / 11
या अंदाजानुसार ३० जूनपर्यंत दिल्लीत १ लाख कोरोनाचे रुग्ण असतील. त्यानंतर १५ हजार बेडची आवश्यकता असेल. १५ जुलैपर्यंत दिल्लीत २ लाखाहून अधिक रुग्णांसाठी ३३ हजार बेडची आवश्यकता असेल. त्याच वेळी, ३१ जुलै पर्यंत साडेपाच लाख रुग्ण होतील. त्यासाठी ८० हजार बेडची आवश्यकता असेल.
9 / 11
दुसरीकडे, कोरोना संक्रमणामध्ये महाराष्ट्राने चीनला मागे टाकलं आहे. येथे कोरोना प्रकरणे १० दिवसात दुप्पट होत आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत ८८ हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर ३१०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी दिल्लीत सुमारे ३० हजार रुग्ण आढळले आहेत तर ८७४ लोकांचा मृत्यू झाला आहे.
10 / 11
जॉन हॉपकिन्स विद्यापीठ आणि मुखर्जी यांच्या टीमने भारतातील आरोग्य सेवा आणि रुग्णालयात बेड व व्हेंटिलेटर नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, सध्या भारतात जवळपास ७ लाख १४ हजार रुग्णालयात बेड्स आहेत, तर २००९ मध्ये ही संख्या ५ लाख ४० हजार इतकी होती.
11 / 11
कोरोना संक्रमणाच्या बाबतीत सध्या अमेरिकेचा टॉप १० मध्ये पहिला क्रमांक येतो, तर त्यानंतर ब्राझील, रशिया, ब्रिटन, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी आणि तुर्की यांचा क्रमांक लागतो.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीMaharashtraमहाराष्ट्र