By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 16:00 IST
1 / 8देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत चालली आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे. मात्र आता डेल्टा व्हेरिएंटचं नवं रूप असलेल्या AY.4नं सर्वांची झोप उडवली आहे.2 / 8देशातील २१.९ टक्के लोकांना दोन्ही डोस मिळाले असून एक डोस घेतलेल्यांचं प्रमाण ५१ टक्के आहे. हे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना AY.4नं डोकेदुखी वाढवली आहे. 3 / 8ब्रिटनमध्ये धुमाकूळ घातलेल्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचं नवं रूप असलेल्या AY.4 चे भारतातील रुग्ण वाढू लागले आहेत. मध्य प्रदेशातील सहा जणांना AY.4 ची लागण झाली आहे. या ६ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.4 / 8कोरोनाच्या AY.4 व्हेरिएंटची लागण झालेल्या सहा जणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्यामुळे हा व्हेरिएंट अधिक संक्रामक आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीचे माजी संचालक राकेश मिश्रांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप तरी याबद्दलचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत.5 / 8AY.4 हा नवा व्हेरिएंट नसून तो डेल्टा व्हेरिएंटचं नवं रूप असल्याची माहिती राकेश मिश्रा यांनी दिली. AY.4 कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटचाच सब लायनेज आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचं पालन करणं अद्यापही गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.6 / 8जगभरात AY.4चे सर्वाधिक रुग्ण ब्रिटनमध्ये आढळले आहेत. अमेरिकेतही याचा परिणाम दिसून येत आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही AY.4ची लागण होत असल्यानं संशोधक आणि वैद्यकीय वर्तुळात चिंतेचं वातावरण आहे.7 / 8INSACOGनं २० सप्टेंबरला बुलेटिन जारी केलं होतं. महाराष्ट्रात करण्यात आलेल्या एका अभ्यासाचा उल्लेख त्यात होता. AY.4ची क्लिनिकल वैशिष्ट्यं B.1.617.2 सारखीच असल्याची माहिती अभ्यासातून समोर आली होती. 8 / 8मध्य प्रदेशात सहा जणांना AY.4ची लागण झाली. या सहा व्यक्तींनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यामुळे AY.4 समोर लसीची क्षमता कमी पडतेय का असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे.