शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आईची माया! स्वतःचा रिपोर्ट निगेटिव्ह; तरी लहानग्या कोरोनाबाधित मुलासोबत राहून देतेय वात्सल्याची छाया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 4:41 PM

1 / 14
कोरोना संक्रमणामुळे अनेक कुटुंबांची ताटातूट झालेली आहे. कोरोना झालेल्या व्यक्तीकडे समाजातील इतर लोक कायमच संशयाच्या नजरेनं पाहतात.
2 / 14
एखाद्या परिसरात किंवा इमारतीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तरी अनेकांचे धाबे दणाणतात. पण कोरोना खरंच इतका जीवघेणा आजार आहे का?
3 / 14
पण कोरोना खरंच इतका जीवघेणा आजार आहे का?, तर नाही. कोरोनाचे रुग्ण लवकरात लवकर बरे होत असल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत.
4 / 14
तसेच अनेक देश कोरोनावर लस तयार करण्यासाठी प्रयत्नशील असून, या वर्षाच्या शेवटच्या महिन्यापर्यंत तरी कोरोनावर लस उपलब्ध होईल, असा अनेक वैज्ञानिकांचा दावा आहे.
5 / 14
कोरोनाच्या संकटात लोक एकमेकांपासून अंतर वाढवत असले तरी त्याचा आई अन् मुलाच्या प्रेमळ नात्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. मिरजापूर जिल्ह्यात आईच्या मायेचं एक जिवंत उदाहरण समोर आले आहे.
6 / 14
एका महिलेमध्ये कोरोनाची लक्षणं आढळल्यानंतर तिची चाचणी घेण्यात आली. त्या महिलेचा पहिल्यांदा अहवाल पॉझिटिव्ह, पण उपचार घेतल्यानंतर अहवाल निगेटिव्ह आला, म्हणून तिनं सुटकेचा निःश्वास सोडला.
7 / 14
पण तरीही तिनं अलगीकरण कक्षात राहण्याचा निर्णय घेतला. कारण तिच्या मुलाचा रिपोर्ट येणं बाकी होतं. आपल्या मुलाचा अहवाल येईपर्यंत महिलेने आपल्या मुलासह विलगीकरण कक्षात राहण्याचे ठरविले. आई मुलाच्या दुसऱ्या अहवालाची वाट पाहत आहे.
8 / 14
7 मे रोजी मुंबईहून परतलेली मिर्झापूरमधील कच्छवा येथील रहिवासी असलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली. त्यानंतर तिच्या कुटुंबातील 11 जणांनाही कोरोनाची लागण झाली.
9 / 14
सर्वांना विंध्याचल विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. महिलेच्या कुटुंबासह आठ जणांचे अहवाल आतापर्यंत नकारात्मक आले आहेत. त्यात तिची जावसुद्धा होती.
10 / 14
मंगळवारी सर्वात पहिल्यांदा संक्रमित महिलेचा अहवालही नकारात्मक आला. ती महिला तिच्या पाच वर्षांच्या मुलासह विलगीकरण कक्षात दाखल होती.
11 / 14
अहवाल नकारात्मक आल्यावर कुटुंबातील इतर लोक निघून गेले, परंतु पाच वर्षांच्या मुलाच्या आईने आपला मुलगा लहान असल्याचं सांगत त्यांच्यासोबत राहण्याचा रुग्णालय कर्मचाऱ्याकडे अट्टहास धरला.
12 / 14
त्यामुळे तिलाही मुलासोबत विलगीकरण कक्षात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
13 / 14
रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी मुलाचा दुसरा नमुना पाठविल्यानंतर त्याचा लवकरच अहवाल येणार आहे. त्यात तो निगेटिव्ह आल्यास त्याला आईबरोबर सोडण्यात येणार आहे.
14 / 14
आई आपल्या मुलाच्या अहवालाची वाट पाहत विलगीकरण कक्षात थांबली आहे. हा अहवाल गुरुवारी येण्याची शक्यता आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या