1 / 12जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अमेरिका, इटली, स्पेनसारख्या देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 2 / 12भारतातही कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही एक लाखांवर गेली असून 3800 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 3 / 12संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेकांना काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांनी पायी जाण्याचा पर्याय निवडला आहे. 4 / 12भारतात लॉकडाऊनसोबत तपासणीला गती दिली जात असताना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे. याच दरम्यान लोकांना आता कोरोनाची नाही तर आणखी एका गोष्टीची भीती वाटत आहे. 5 / 12लॉकडाऊन नंतरचं आयुष्य, नोकरी, व्यवसाय याविषयी लोकांना सर्वात जास्त चिंता असल्याची माहिती आता समोर आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) लखनऊने केलेल्या सर्व्हेमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. 6 / 12आयआयएम लखनऊने Understanding public sentiment during lockdown या विषयावर एक ऑनलाईन सर्व्हे घेण्यात आला होता. त्यात लोकांना आपल्या भविष्याविषयी सर्वात जास्त चिंता वाटत असल्याचं स्पष्ट झालं आहे.7 / 12तब्बल 79 टक्के लोकांना या गोष्टींची चिंता आहे. तर 40 टक्के लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. तर 22 टक्के लोक दु:खी झाल्याची माहिती समोर आली आहे.8 / 12आयआयएमच्या सेंटर फॉर मार्केटिंग इन इमर्जिंग इकॉनमिक्स (सीएमईई) ने या सर्व्हेत 23 राज्यांतल्या 104 शहरांमधल्या लोकांनी सहभाग घेतला होता. 9 / 12मंदीतली अर्थव्यवस्था, कर्ज, आरोग्यावरचा खर्च वाढणार आहे, लोकांचा व्यवहार कसा बदलेल याची लोकांना आता चिंता लागलेली आहे. तसेच महागाई वाढेल याची लोकांना भीती वाटत आहे. 10 / 12अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या क्षेत्रांवर कोरोनामुळे प्रचंड मोठं संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे कित्येकांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे.11 / 12अनेकांना रोजगार देणाऱ्या प्रमुख क्षेत्रांना कोरोनाचा थेट फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-धंदे बंद झाले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे हाल झाले आहेत. 12 / 12छोटे व्यावसायिक, फेरीवाले, बांधकाम मजूर, हाताने रिक्षा ओढणारे, हमाल अशी दैनंदिन कमाई करणाऱ्या मजुरांचा रोजगार हा लॉकडाऊनमुळे गेला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.