CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांच्या संख्येत चौपट वाढ; वेळीच व्हा सावध, रिसर्चमधून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 15:40 IST
1 / 16कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन आणि आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेतली जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. 2 / 16काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग थोडा मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. 3 / 16गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 41,157 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 518 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. 4 / 16कोरोनामुळे देशात 4,13,609 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाग्रस्तांपैकी 4,22,660 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3,02,69,796 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 5 / 16सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या दिर्घकालीन लक्षणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत आता चार पटीने वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. 6 / 16दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात करण्यात आलेल्या रिसर्चमधून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. अधिक काळ कोरोना संक्रमित असलेल्या व्यक्तींमध्ये लक्षणं आणि इतर समस्या या चौपट वाढल्याचं रिसर्चमध्ये म्हटलं आहे. 7 / 16रिसर्चनुसार, कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक संक्रमक होती. यावेळी व्हायरसचं स्वरूप हे चिंताजनक आणि वेगवेगळं होतं. तसेच लक्षणं देखील नवीन होती. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. 8 / 16खूप ताप, फुफ्फुसांमध्ये गंभीर इन्फेक्शनमुळे कोरोना रुग्णांची प्रकृती अधिक चिंताजनक आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर आठ दिवसांनंतर ऑक्सिजन स्तर खालावतो. तसेच फुफ्फुसांमध्ये फ्रायब्रोसिसची समस्या येत आहे. 9 / 16कोरोनाची लागण झाल्यानंतर 20 ते 30 दिवसांनी कोरोनाची दिर्घकालीन लक्षणं आणि आरोग्यविषयक समस्या दिसून येत आहेत. यामुळे लोकांना पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागत आहे. 10 / 16दिल्लीतील खासगी रुग्णालयातील न्यूरो विभागाने केलेल्या रिसर्चमध्ये कोरोनावर मात केल्यानंतर 20 ते 25 रुग्णांमध्ये अशक्तपणा, उलटी यासारख्या समस्या जाणवत आहेत. रुग्णांमध्ये तरुणांचा अधिक समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 11 / 16कोरोनामुळे 50 टक्के रुग्णांना हेल्थ कॉम्प्लिकेशन्स म्हणजेच आरोग्यविषयक समस्या जाणवत आहेत. भयंकर बाब म्हणजे किडनी आणि लिव्हरवर गंभीर परिणाम होत आहे,. लँसेटच्या रिपोर्टमधून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे.12 / 16लँसेटच्या रिपोर्टने चिंतेत भर टाकली आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासात जवळपास 50 टक्के रुग्णांमध्ये काहीनाकाही आरोग्य विषयक समस्या आहेत. कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.13 / 16लँसेटच्यावतीने यूकेमध्ये 73197 लोकांवर एक संशोधन करण्यात आलं. त्यामध्ये रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या 49.7 टक्के रुग्णांमध्ये काहीना काही आरोग्यविषयक समस्या या होत्या. तसेच बरं झाल्यावर देखील अशीच परिस्थिती होती.14 / 16कोरोनावर मात केल्यानंतर देखील अनेक लोकांमध्ये वेगवेगळी लक्षणं पाहायला मिळाली. कोरोनाचा तरुणांवर अधिक गंभीर परिणाम होत असल्याचं या रिपोर्टमध्ये विशेष नमूद करण्यात आलं आहे.15 / 1619 ते 29 वर्षे वयोगटातील 27 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली. मात्र त्यानंतर देखील ते खूप वेळ आजारी होते. त्यांच्यामध्ये लाँग कोविडची लक्षणं पाहायला मिळाली. त्यामुळेच त्यांच्या शरिरातील अवयवांवर याचा परिणाम झाला आहे.16 / 16किडनी आणि लिव्हरवर याचा सर्वात जास्त परिणाम होत असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या लोकांमध्ये कार्डियक एरिद्मिया हा आजार आढळून आला आहे. तसेच अनेक रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.