1 / 6मे महिन्याच्या सुरुवातीपासून प्रचंड वेगाने वाढत असलेली देशातील कोरोना रुग्णांची संख्या सोमवारी रात्री एक लाखांच्यावर पोहोचली आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढू लागल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी देशवासियांच्या दृष्टीने काही दिलासादायक बाबीही समोर आल्या आहेत. 2 / 6समोर आलेल्या माहितीनुसार देशातील एक लाख रुग्णापैकी तब्बल ३९ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा रिकव्हरी रेट हा ४० टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. 3 / 6अन्य महत्त्वाची बाब म्हणजे कोरोनाचा फैलाव झालेले अन्य युरोपीय देश आणि अमेरिकेच्या तुलनेमध्ये भारतातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा दरही कमी आहे. भारतात आतापर्यंत सुमारे ३ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा दर केवळ ३ टक्के आहे.4 / 6मंगळवारी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनाचे एकूण एक लाख १ हजार १३९ रुग्ण आहेत. त्यापैकी ३९ हजार १७४ रुग्ण बरे झाले आहेत. तर ३ हजार १६३ जणांचा मृत्यू झाला आहे. 5 / 6कोरोनाग्रस्तांच्या रिकव्हरी रेटबाबत नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत म्हणाले की, कोरोनाच्या संसर्गादरम्यान, केवळ पॉझिटिव्ह केसच नव्हे तर मृत्यूदर आणि रिकव्हरी रेटही महत्त्वाचा असतो. याबाबत जगाच्या तुलनेत भारतातील स्थिती खूप चांगली आहे. 6 / 6भारतात दर दहा लाख लोकांमागे दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. तर अमेरिकेमध्ये हे प्रमाण २७५ तर स्पेनमध्ये ५९१ आहे. भारतात कोरोनामुळे होणारा मृत्यूदर ३ टक्के आहे. तर फ्रान्समध्ये हेच प्रमाण १६ टक्के आहे, अशी माहिती अमिताभ कांत यांनी दिली.