1 / 8कोरोनाव्हायरसचा नवीन प्रकार जेएन १ हा जगात वेगाने पसरत आहे. कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव हा चिंतेचा ठरला विषय आहे. विशेषतः ज्या देशांमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात, तिथे हा विषाणू हातपाय पसरत आहे. हाँगकाँग, थायलंड आणि सिंगापूरमध्ये कोविड-१९ चा हा नवीन प्रकार आढळून आला आहे. पण, सध्या लॉकडाऊनसारखी परिस्थिती नाही. त्यामुळे, फिरण्यावर कोणतेही बंधन नाही. पण सावधगिरी आणि दक्षता अत्यंत महत्त्वाची आहे. 2 / 8सिंगापूरमध्ये एका आठवड्यात कोरोना व्हायरसची प्रकरणे जवळपास १४,२०० वर पोहोचली आहेत. येथे दररोज रुग्णांची संख्या १०० वरून १३३ पर्यंत वाढत आहे. कोरोनाचे 'LF.७' आणि 'NB.१.८' विषाणू येथे पसरत आहेत.3 / 8पर्यटकांच्या आवडत्या देशांपैकी एक असलेल्या थायलंडमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत . सोंगक्रान महोत्सवानंतर, तेथील दोन प्रमुख भागात कोव्हिडचे रुग्ण आढळले आहेत. मोठ्या संख्येने भारतीय थायलंडला सुट्टीसाठी जातात.4 / 8हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दर १.७ वरून ११.४ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. या देशात कोरोनामुळे ३० जणांचा मृत्यू झाला आहे, जरी त्यापैकी बहुतेक लोक वृद्ध आहेत. चीनच्या हाँगकाँगमध्ये इतके मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे.5 / 8गेल्या आठवड्यापासून चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण दुप्पट झाले आहेत. चीनच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते, कोरोनाच्या रुग्णांनी गेल्या उन्हाळ्यातील आकडेवारी ओलांडली आहे. 6 / 8२०२५ मध्ये भारतात कोरोनाचे २५७ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये ओरिसा, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि गुजरात यांचा समावेश आहे. परंतु रुग्णांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत. फरीदाबाद-गुरुग्राममध्ये ३ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. महाराष्ट्रात २६ आणि गुजरातमध्ये १५ नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोना जेएन १ प्रकार कमी गंभीर आहेत. 7 / 8गुरुग्राममध्ये मुंबईहून परतलेल्या ३१ वर्षीय महिलेला संसर्ग झाल्याचे आढळले. हा प्रकार एका ६२ वर्षीय पुरूषामध्ये आढळून आला. दोन्ही रुग्ण फिरायलाही गेले नाहीत. दोघांनाही आयसोलेशनमध्ये ठेवले जात आहे आणि त्यांचे निरीक्षण केले जात आहे. फरीदाबादमध्ये एका सुरक्षा रक्षकही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. 8 / 8गुजरातमध्ये ओमिक्रॉन प्रकाराचे १५ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यापैकी अहमदाबादमध्ये १३ आणि राजकोटमध्ये एक प्रकरण आहे. गुजरात आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, सिंगापूर, थायलंड आणि चीनसारख्या देशांमध्ये वाढत्या प्रकरणांमुळे हे रुग्ण भारतात आढळले आहेत. पण सर्वांची प्रकृती सामान्य आहे. जानेवारीपासून महाराष्ट्रात १३२ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर १२६ रुग्ण मुंबईतील आहेत.