CoronaVirus Live Updates : कर्तव्यनिष्ठेला सलाम! लसीकरणासाठी कोरोना वॉरिअर्सचा जीव मुठीत घेऊन प्रवास; भर पावसात पार केली नदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 11:14 IST
1 / 14देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 3,11,74,322 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,14,482 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2 / 14देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 30,093 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 374 जणांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे.3 / 14देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 125 दिवसांतील नीचांक आहे. 4 / 14कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 4,06,130 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.5 / 14कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. आपल्या घरापासून दूर राहून डॉक्टर्स रुग्णांवर उपचार करत आहेत. असीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. 6 / 14रुग्णांची सेवा करता यावी, त्यांच्यावर वेळेत उपचार करता यावेत यासाठी कोरोना वॉरिअर्सनी चक्क नदी पार केल्याची घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर कोरोना वॉरिअर्सचा हे फोटो तुफान व्हायरल झाला असून त्यांचं भरभरून कौतुक करण्यात येत आहे. 7 / 14काही वैद्यकीय कर्मचारी दुर्गम भागात आपली वैद्यकीय सेवा बजावण्याठी जात आहेत. यावेळी त्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रुग्णांची सेवा करण्यासाठी जात असताना त्यांना भर पावसात नदी पार करावी लागत आहे. 8 / 14जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील कंडी ब्लॉकमधील परिसरात लोकांना कोरोना लस देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना भर पावसात नदी पार करून प्रवास करावा लागत आहे. आतापर्यंत हजारो लोकांना लस देण्यात आली आहे. 9 / 14कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांनी स्वतः पुढे येत कोरोना लस (Corona Vaccine) घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. 10 / 14वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा जगभरात उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 18 कोटींच्या वर गेली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.11 / 14कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन आणि आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेतली जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.12 / 14सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या दिर्घकालीन लक्षणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत आता चार पटीने वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.13 / 14दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात करण्यात आलेल्या रिसर्चमधून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. अधिक काळ कोरोना संक्रमित असलेल्या व्यक्तींमध्ये लक्षणं आणि इतर समस्या या चौपट वाढल्याचं रिसर्चमध्ये म्हटलं आहे.14 / 14रिसर्चनुसार, कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक संक्रमक होती. यावेळी व्हायरसचं स्वरूप हे चिंताजनक आणि वेगवेगळं होतं. तसेच लक्षणं देखील नवीन होती. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.