CoronaVirus: कोरोना लस: भारत आज मोठे पाऊल टाकणार; पुण्यावरच सारी मदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 13:02 IST
1 / 10भारतामध्ये जवळपास कोरोनावरील सात लसींची चाचणी सुरु झाली आहे. यामध्ये जगभरात लसींची बादशाह असलेली सीरम इन्स्टिट्यूट ब्रिटेनचे ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझिनेका कंपनीच्या लसीमुळे आघाडीवर आहे. 2 / 10आज 25 ऑगस्टला देशात कोरोना व्हायरसवरील लसीच्या दुसऱ्या चाचणी टप्प्याला सुरुवात होणार आहे. हे व्हॅक्सिन ब्रिटेनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. मात्र, या लसीचे उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये केले जात आहे. 3 / 10पीटीआयनुसार सीरम इन्स्टिट्यूटकडून आज कोरोना लसीची दुसरी चाचणी सुरु केली जाणार आहे. 4 / 10कोणत्याही लसीचा दुसरा टप्पा खूप महत्वाचा असतो. कारण फेज-2 ट्रायलसोबत मोठ्या प्रमाणावर लसीच्या ट्रायल ३ टप्प्याचा रस्ता साफ होतो. भारतात तयार केल्या जाणाऱ्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या या लसीचे नाव कोविशिल्ड (Covishield) ठेवण्यात आले आहे. 5 / 10पुण्याच्या भारती विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या चाचणी टप्प्याची सुरुवात होणार आहे. याी टप्प्यात सुदृढ व्हॉलिंटिअरना Covishield लस टोचली जाणार आहे. 6 / 10ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या या लसीच्या उत्पादनासाठी सीरम इंस्टिट्यूट अॅस्ट्राझिनेका कंपनीसोबत करार केला आहे. सीरमला भारताच्या सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गेनाइजेशन (CDSCO) कडूनही परवानगी मिळाली आहे. 7 / 10सीरम इन्स्टिट्यूटचे अतिरिक्त संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी पीटीआयला सांगितले की, आमच्या कंपनीच्या उद्दिष्टानुसार आम्ही जागतिक दर्जाची कोविड 19 लस आपल्या देशातील नागरिकांना उपलब्ध करणार आहोत. यामुळे या लसीच्या बाबत देश आत्मनिर्भर होणार आहे. 8 / 10ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने चाचणी प्रक्रियेमध्ये वेग आणण्यासाठी सीरमला 3 ऑगस्टलाच दुसरा आणि तिसरा टप्पा सुरु करण्याची परवानगी दिली होती. सीरम इन्स्टिट्यूट तिसऱ्या टप्प्याची चाचणी 17 राज्यांमध्ये करणार आहे. 9 / 10दुसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये जवळपास 1600 लोक भाग घेणार आहेत. हे सर्व व्हॉलेंटिअर 18 वर्षांपेक्षा अधिक वयाचे असणार आहेत. सीरम ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. 10 / 10दुसरीकडे रशिया आणखी एक लस लाँच करण्याच्या तयारीत आहे. सप्टेंबरमध्ये ही लस बाजारात आणली जाणार आहे. पहिल्या लसीला विश्वासार्हतेमुळे थंडा प्रतिसाद मिळाला आहे.