शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्राणूंमध्ये झाला मोठा बदल, नव्या अपत्यांमध्ये चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 16:26 IST

1 / 7
सुमारे साडे पाच वर्षांपूर्वी कोविड-१९ च्या विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला होता. या विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण जगात लॉकडाऊन करावं लागलं होतं. दरम्यान कोरोनाच्या विषाणूंमुळे नर उंदरांच्या शुक्राणूंमध्ये बदल होत असल्याची आणि त्यामुळे त्यांच्या पुढील अपत्यांमध्ये चिंता वाढल्याची माहिती नव्या अध्ययनामधून समोर आली आहे. ही बाब कोरोनामुळे निर्माण झालेली दीर्घकाळापर्यंत चालणारी समस्या असू शकते. तसेच त्याचा पुढील पिढ्यांवर परिणाम होऊ शकतो.
2 / 7
ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न येथे फ्लोरी इन्स्टिट्युट ऑफ न्युरोसायन्स अँड मेंटल हेल्थच्या संशोधकांनी हा शोध लावला आहे. ही माहिती १२ ऑक्टोबर रोजी नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे.
3 / 7
हे संशोधन करण्यासाठी शास्त्रज्ञांनी नर उंदरांना कोविड विषाणूचा संसर्ग घडवून आणला. त्यानंतर त्यांचं निरोगी मादी उंदरांसोबत मिलन घडवून आणलं. त्यानंतर त्यांच्यापासून जन्माला आलेल्या उंदराच्या आरोग्याचा आणि वर्तनाचा अभ्यास केला. यामध्ये संसर्गजन्य पित्याच्या अपत्यांमध्ये चिंता दर्शवणारं वर्तन अधिक दिसून आलं. तर निरोगी पित्याच्या अपत्यांमध्ये असं दृश्य दिसलं नाही.
4 / 7
उल्लेखनीय बाब म्हणजे कोरोनाचा संसर्ग झालेल्या नरापासून जन्माला आलेल्या सर्व अपत्यांवर परिणाम झालेला दिसल. विशेषकरून मादी मुलांच्या मेंदूतील हिप्पोकेंपस भागातील काही जीनचं वर्तन बदललेलं दिसलं. याबाबत कॅरोलिना गुबर्ट या शास्रज्ञाने सांहितलं की, हा बदल एपिजेनेटिक इनहेरिटेंस आणि मेंदूच्या विकासात झालेल्या गडबडीमुळे होऊ शकतो. त्यामुळे चिंता करण्याचं प्रमाण वाढतं.
5 / 7
कोविडच्या संसर्गाचा अपत्यावर दीर्घकाळासाठी होणारा परिणाम दर्शवणारं हे पहिलंच अध्ययन आहे. या विषाणूने नराच्या शुक्राणूंमधील आरएनएमध्ये बदल घडवून आणला. हा आरएनए मेंदूचा विकास करणाऱ्या जिनवर नियंत्रण ठेवतो. इन्स्टिट्युटमधील प्रमुख संशोधक अँथोनी हेनन यांनी सांगितले की, या संशोधनामधून कोविड १९ च्या साथीचा परिणाम येणाऱ्या पिढ्यांवर पडू शकतो, असे दिसून येत आहे.
6 / 7
मात्र सध्यातरी हे संशोधन उंदरांवर करण्यात आलं आहे. मात्र मनुष्यांवर संशोधन होणं बाकी आहे. जर हे संशोधन माणसांवर करण्यात आलं तर जगभरातील लाखो मुले आणि त्यांचे कुटुंबीय प्रभावित होतील, हा सार्वजनिक आरोग्यासाठी मोठा धोका आहे, असे हेनन यांनी सांगितले.
7 / 7
कोरोना विषाणूचा फैलावर २०२० च्या सुरुवातीला झाला होता. तसेच या विषाणूमुळे जगभरात सुमारे ७० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवला होता. मात्र प्रत्यक्षात यापेक्षा अधिक मृत्यू झाले असावेत, असे सांगितले जाते. एवडंच नाही तर या साथीने मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम घडवून आणले होते.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीय