By मुकेश चव्हाण | Updated: February 3, 2021 15:57 IST
1 / 8विशेष म्हणजे यावेळी राहुल गांधींनी बिर्याणी आणि रायता बनविण्यासाठी स्वत: मदत केल्याचे फोटोमधून दिसून आले होते. 2 / 8काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचे काही दिवसांपूर्वी वायनाडचा दौरा केला, त्यावेळी तेथील व्हिलेज कुकुींग चॅनेलच्या टीमसोबत जेवणाचा आस्वाद घेतला होता.3 / 8मशरुन बिर्याणी तयार झाल्यानंतर याचा स्वाद अतिशय खमंग आणि भारी असल्याचं राहुल यांनी म्हटलं, त्यावेळी उपस्थितांनी राहुल यांचे आभार मानले. 4 / 8राहुल गांधींनी येथील लोकांशी मस्त मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. राहुल गांधींचे यादरम्याने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या.5 / 8आता पुन्हा राहुल गांधींच्या नव्या लूकचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. संसदेत आणि राजकीय कार्यक्रमांना कायम कुर्ता- पायजमामध्ये दिसणारे राहुल गांधी मंगळवारी संसदेत वेगळ्या लूकमध्ये दिसले.6 / 8राहुल गांधी मंगळवारी संसदेत हाफ शर्ट आणि फॉर्मल पँट या लूकमध्ये पोहचले होते.7 / 8लोकसभेतील कामकाज संपल्यानंतरचे राहुल गांधीचे हे फोटो आहे. लोकसभेचे कामकाज संपल्यानंतर त्यांनी इतर मंत्र्याशी बातचीत केली.8 / 8राहुल गांधीच्या हातात आयपॅड आहे. राहुल गांधी यांच्या या लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे.