बापरे! एकाच घरात आढळले २७ कोब्रा साप, संपूर्ण गावात उडाली खळबळ; मग काय घडलं पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 16:12 IST
1 / 8ओदिशाच्या कालाहांडी परिसरातील एका घरात तब्बल २७ कोब्रा साप आढळून आले आणि संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. पाहता पाहता बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि घराबाहेर बघ्यांची गर्दी जमली. 2 / 8घरात आढळून आलेल्या सापांमध्ये एक मादी होती तर इतर सर्व सापाची २६ पिल्लं होती. 3 / 8 इतक्या मोठ्या प्रमाणात साप आढळून आल्यानं गावकरी खूप घाबरले आणि त्यांनी तातडीनं वन विभागाला याची माहिती दिली. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बचाव कार्य केलं. 4 / 8घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत असून बघ्यांची गर्दी होऊ लागली आहे. 'एका घरात कोब्रा साप आढळून आल्याची माहिती मिळताच आमचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पण एका सापासोबतच इतर २६ लहान साप देखील आढळून आले', अशी माहिती वन विभागाचे अधिकारी वीरेंद्र कुमार साहू यांनी दिली. 5 / 8सर्व साप सुरक्षित असून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं आहे, असंही साहू यांनी सांगितलं. 6 / 8पावसाळ्यामध्ये सापांच्या वारुळात पाणी आणि माती जमा होते. त्यामुळे ते बाहेर येतात आणि नव्या अधिवासाच्या शोधात असतात, असं सर्पतज्ज्ञांनी सांगितलं. 7 / 8थंड वातावरणामुळे ते वारुळातून बाहेर निघून अशा घरांमध्ये शिरतात, असंही ते म्हणाले. घटनेचे व्हिडिओ व्हायरल होत असून लोक सापांची सुटका करणाऱ्या वन अधिकाऱ्यांचं कौतुक करत आहेत. 8 / 8सर्व सापांची सुटका करण्यात आल्यानंतर गावकऱ्यांचाही जीव भांड्यात पडला. अनेकांनी तर सर्व सापांची सुटका करणाऱ्या वन विभागाच्या सर्पमित्राला पुरस्कारानं सन्मानित करण्याची मागणी देखील केली आहे.