शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus: काय वाटले असेल त्या हृदयरोग तज्ज्ञाला; स्वत:च्याच हॉस्पिटलमध्ये बापाला बेड मिळाला नाही, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 6:02 PM

1 / 10
''मी स्वत: एक डॉक्टर आहे आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये सेवा देतो. आतापर्यंल अनेक रुग्णांचे प्राण वाचविलेत, परंतू जेव्हा माझ्यावर ही वेळ आली तेव्हा मी सरकारी यंत्रणेसमोर हरलो. माझ्या वडिलांना नाही वाचवू शकलो, त्यांना वेळेवर माझ्याच हॉस्पिटलमध्ये साधा बेडसुद्धा मिळू शकला नाही.'', हे शब्द आहेत एका जिल्हा रुग्णालयातील हृदयरोग तज्ज्ञाचे.
2 / 10
कोरोनाच्या संकटात सामान्यांना बेडसाठी शहरांतील प्रत्येक हॉस्पिटलचे दरवाजे ठोठवावे लागत आहेत. अनेकांनी तर हॉस्पिटलच्या दारात प्राण सोडले आहेत. असाच एक प्रसंग लखनऊ सारख्या शहरातील सरकारी डॉक्टर दीपक यांच्यासोबत घडला आहे.
3 / 10
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आयसीय़ूतील रुग्णांवर डॉ. दीपक उपचार करत होते. गेल्या वर्षभरात त्यांनी अनेक कोरोनाबाधितांचे प्राण वाचविले. त्या आधीच्या सेवेत हृदयविकाराच्या अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया, त्यांच्यावर वेळेत उपचार करून त्यांना सुखरूप घरी पाठविले.
4 / 10
डॉ. दीपक यांना कोरोना बाधितांवर उपचार करताना कोरोनाची बाधा झाली. दीपक यांच्यासोबत त्यांच्याद्वारे त्यांच्या घरच्या चार जणांनाही कोरोनाचे संक्रमण झाले. यामध्ये त्यांचे 74 वर्षीय वडील देखील होते.
5 / 10
दीपक यांचे वडील, रेल्वेच्या नोकरीतून निवृत्त झाले होते. अर्जुन चौधरी यांना मधुमेह आणि हृदयविकार होता.
6 / 10
जेव्हा दीपक यांना त्यांच्या वडिलांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली तेव्हा त्यांनी कोविड हॉस्पिटलशी संपर्क साधला. मात्र, त्यांना कोरोना रिपोर्ट नसल्याने भरती करण्यास नकार देण्यात आला.
7 / 10
सहा एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचा आला. यानंतर स्वत: पॉझिटिव्ह असलेल्या दीपक यांनी पुन्हा कोविड सेंटरमध्ये फोन केला. मात्र, तेव्हा त्यांना लवकरच अॅडमिट करून घेऊ, असे सांगून टोलवाटोलवी करण्याचे काम समोरून करण्यात आले.
8 / 10
वडिलांची तब्येत बिघडल्यानंतर डॉ. दीपक यांनी बाजारातून ऑक्सिजन सिलिंडर घेतला. कोविड कंट्रोल रूमने बेड सोडा अँम्बुलन्सही दिली नाही. शेवटी दीपकच त्यांच्या वडिलांना ऑक्सिजन सपोर्टवर लोकबंधू हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. परंतू आयसीयू बेड मिळाला नाही.
9 / 10
दुसऱ्या दिवशी खासगी मेडिकल क़ॉलेजमध्ये दुपारी 1.30 वाजता बंड मिळाला. परंतू तिथेही अर्धवट व्यवस्था मिळाली. दीपकनाही त्यांच्या वडिलांनी भेटू दिले नाही.
10 / 10
अखेर सायंकाळी उपचार न मिळाल्याने त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. डॉक्टर असूनही वडिलांना वाचवू शकलो नाही, असे शल्य त्यांना आता बोचत राहणार आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील त्यांना 24 तासांची वाट पहावी लागली.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर