शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

विश्वास बसणार नाही...! मोदी चालले अशा देशा, जिथे १३ महिन्यांचे असते वर्ष; आज तिथे २०१८ सुरु आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 10:20 IST

1 / 7
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १६-१७ डिसेंबर २०२५ रोजी होणारा इथिओपिया दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. जॉर्डन आणि ओमानच्या दौऱ्यादरम्यानचा हा आफ्रिका दौरा भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा आहे, कारण भारत सध्या 'ग्लोबल साऊथ' (विकसनशील देशांचा समूह) चा प्रमुख आवाज म्हणून जगात उदयास येत आहे.
2 / 7
या वर्षातील पंतप्रधान मोदींचा हा तिसरा आफ्रिका दौरा आहे. ग्लोबल साऊथच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक पाश्चात्त्य शक्ती अस्वस्थ असल्या तरी, इथिओपियासारख्या महत्त्वाच्या देशांसोबतचे संबंध अधिक दृढ करण्यावर भारताचा भर आहे.
3 / 7
इथिओपिया हा पूर्व आफ्रिकेतील (हॉर्न ऑफ आफ्रिका) एक मोठा आणि मोक्याचा देश आहे. २०२३ मध्ये भारताने सक्रिय भूमिका बजावत इथिओपियाला BRICS समूहात समाविष्ट करून घेतले. इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांनी अनेक ग्लोबल साऊथ बैठकांमध्ये भाग घेतला असून, ते भारताच्या नेतृत्वाचे उघडपणे समर्थन करतात.
4 / 7
पंतप्रधान मोदी आणि इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांच्यात यापूर्वीही भेटी झाल्या आहेत. या दौऱ्यात दोन्ही देश संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, कृषी, शिक्षण, व्यापार आणि गुंतवणुकीसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा करतील.
5 / 7
भारत हा इथिओपियाचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आणि तिसरा सर्वात मोठा गुंतवणूकदार भागीदार आहे. ६५० हून अधिक भारतीय कंपन्यांनी इथिओपियामध्ये सुमारे ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.
6 / 7
सुमारे १५० वर्षांपूर्वी अनेक भारतीय (विशेषतः गुजराती) इथिओपियामध्ये स्थायिक झाले होते. आजही तेथील शिक्षण संस्थांमध्ये १५० हून अधिक भारतीय प्राध्यापक कार्यरत आहेत.
7 / 7
हा देश त्याच्या गीझ कॅलेंडरसाठी देखील ओळखला जातो. यामध्ये १२ ऐवजी १३ महिन्यांचे वर्ष असते. येथील लोक येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या ७ किंवा ८ वर्षांपूर्वीचे कॅलेंडर पाळतात, म्हणूनच हा देश जगाच्या इतर भागांपेक्षा ७ वर्षे मागे आहे.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी