1 / 9ऑपरेशन सिंदूर राबवून भारताने पाकिस्तानात हाहाकार उडवून दिला आहे. १३ पैकी पाकिस्तानचे ११ एअरबेसना उडवून देण्यात आले आहे. याकामी भारताची ब्रम्होस मिसाईल यशस्वी ठरली आहे. या मिसाईलचे नाव आता जगात गाजू लागले आहे. तुम्हाला माहितीये ही मिसाईल कोणी बनविली? तिची क्षमता काय आहे...2 / 9पाकिस्तानी रडारला चकमा देत ब्रम्होस मिसाईल पाकिस्तानात घुसली होती, ही मिसाईल भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी बनविलेली आहे. या मिसाईलने आपली क्षमता सिद्ध केली असून १५ मिसाईल आणि पाकिस्तानचे ११ एअरबेस अशी भारताने बाजी मारली आहे.3 / 9कलाम यांची ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) चे प्रमुख म्हणून त्यांनी भारत आणि रशियामधील सरकारी पातळीवरील भागीदारीचे नेतृत्व केले होते. १९९८ मध्ये मॉस्को येथे डॉ. कलाम आणि रशियाचे उपसंरक्षणमंत्री एन. व्ही. मिखाइलोव्ह यांच्यात हा करार झाला होता. याद्वारे ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना झाली होती. 4 / 9ब्रह्मोस क्षेपणास्त्र कमी उंचीवरून जात लक्ष्यावर वेगाने मारा करण्याची क्षमता ठेवते. हे क्षेपणास्त्र शत्रूच्या रडार आणि हवाई संरक्षण प्रणालींपासून वाचण्यासाठी जमिनीच्या अगदी जवळून, १० ते १५ मीटर उंचीवर उडू शकते. यामुळेच चिनी बनावटीची रडार प्रणाली ब्रम्होसला शोधू शकली नाही. 5 / 9ब्रम्होसचा वेगही प्रचंड आहे. ब्रह्मोसचा वेग २.८ मॅक म्हणजेच ध्वनीच्या वेगापेक्षा २.८ पट वेगाने हे मिसाईल जाऊन आदळते. ध्वनीचा वेग प्रति सेकंद ३४३ मीटर आहे. अशाप्रकारे ब्रह्मोसचा वेग प्रति सेकंद ९६० मीटर आहे. म्हणजेच एका सेकंदात अंदाजे १ किलोमीटर एवढे अंतर ब्रम्होस पार करते. 6 / 9ब्रह्मोस हे एक सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे, ज्याचा वेग हा ताशी सुमारे २,८००-३,००० किलोमीटर एवढा प्रचंड आहे. भारतातील ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियातील मोस्कवा नदीवरून त्याचे नाव ठेवण्यात आले आहे. 7 / 9जमीन, समुद्र (जहाजे आणि पाणबुड्या) आणि हवेतून (विमान, उदा. सुखोई-३०एमकेआय) द्वारे हे मिसाईल डागले जाऊ शकते. हे लक्ष्यावर अचूक भेदण्यासाठी अद्ययावत नेव्हीगेशन सिस्टीमने लेस आहे. 8 / 9दिवसरात्र आणि कोणत्याही हवामानात काम करेल अशीच याची बनावट आहे. एकदा लाँच झाल्यावर त्यावर सारखे लक्ष ठेवण्याची गरज राहत नाही, हे देखील याचे एक चांगले फिचर आहे. 9 / 9ब्रम्होस हे मिसाईल २९०-४५० किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. तसेच सोबत २०० ते ३०० किलो स्फोटके घेऊन जाते. यामुळे पाकिस्तानच नाही तर चीनची शहरे, लष्करी तळ देखील या मिसाईलच्या परिघात येतात.