भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 20:23 IST
1 / 12Indian Railway Ticket Reservation Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगमधील फसवणूक रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने एक मोठे पाऊल उचलले आहे. आता ऑनलाइन तिकीट बुकिंग प्रणालीत मोठा बदल होणार आहे. १ ऑक्टोबर २०२५ पासून आरक्षण सुरू झाल्यानंतर ज्या लोकांची आधार कार्ड पडताळणी झाले आहे, तेच पहिल्या १५ मिनिटांसाठी ऑनलाइन तिकीट बुक करू शकतील. 2 / 12हा नियम आयआरसीटीसी वेबसाइट आणि मोबाईल अॅप दोन्हीवर लागू असणार आहे. या संदर्भात, १ ऑक्टोबर २०२५ पासून फक्त आधार-प्रमाणित वापरकर्त्यांनाच तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांत IRCTC वेबसाइट किंवा अॅपद्वारे सामान्य आरक्षण बुक करण्याची परवानगी असेल. सध्या हे निर्बंध फक्त तत्काळ बुकिंगवर लागू आहेत.3 / 12रेल्वेने म्हटले आहे की, आता आरक्षण सुरू झाल्यापासून पहिल्या १५ मिनिटांसाठीच आधार प्रमाणीकरण असलेल्या वापरकर्त्यांना आरक्षित जनरल तिकिटांचे बुकिंग करता येईल. ही सुविधा फक्त आयआरसीटीसी वेबसाइट आणि मोबाईल अॅपवर उपलब्ध असेल. याचा थेट परिणाम अशा प्रवाशांवर होईल जे बुकिंग सुरू होताच लगेचच तिकीट काढण्याचा प्रयत्न करतात.4 / 12रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की हा नवीन नियम फक्त ऑनलाइन बुकिंगसाठी लागू होईल. संगणकीकृत पीआरएस काउंटरवरून तिकिटे खरेदी करणाऱ्यांसाठी वेळ आणि प्रक्रियेत कोणताही बदल केलेला नाही. त्याचप्रमाणे, अधिकृत तिकीट एजंटसाठी (सुरुवातीच्या दिवशी आरक्षित तिकिटे बुक करू नये) आधीच लागू असलेली १० मिनिटांची मर्यादा कायम राहील.5 / 12हा बदल अंमलात आणण्यासाठी, CRIS आणि IRCTC ला आवश्यक तांत्रिक बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच झोनल रेल्वे विभागांना स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यास आणि त्यांचे पालन सुनिश्चित करण्यास सांगितले आहे, असे रेल्वेने म्हटले आहे. तिकीट आरक्षण प्रणालीचा गैरवापर रोखणे आणि सामान्य प्रवाशांना प्राधान्य देणे हे भारतीय रेल्वेचे उद्दिष्ट आहे. 6 / 12यामुळे तिकीट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि दलाल किंवा एजंटांकडून तिकिटे ब्लॉक करणे थांबेल, असा विश्वास रेल्वेकडून व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय, प्रवाशांना लवकर तिकिटे बुक करण्याची चांगली संधी मिळेल.7 / 12डिजिटल सुरक्षा आणि प्रवाशांची सोय दोन्ही लक्षात घेऊन रेल्वेचे हे पाऊल उचलण्यात आले आहे, जेणेकरून येणाऱ्या सण आणि प्रवास हंगामात खऱ्या प्रवाशांना दिलासा मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. 8 / 12रेल्वेने ०१ जुलै पासून तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार वेरिफिकेशन आवश्यक केले होते. आता रेल्वेचं तिकीट आरक्षित करण्यासाठी आधार वेरिफिकेशन आवश्यक केले आहे. रेल्वेचा हा निर्णय तिकीट बुकिंग सुरु झाल्यानंतर सामान्य प्रवाशांना तिकीट बुक करता यावं यासाठी करण्यात आले आहे.9 / 12काही एजंट तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर सॉफ्टवेअरच्या मदतीने तिकीट बुक करतात. ज्यामुळे सामान्य वापरकर्ते किंवा प्रवाशांना तिकीट बुक करता येत नाही. आता आधार वेरिफिकेशनमुळे प्रवासी तिकीट बुक करू शकेल.10 / 12रेल्वेच्या रिझर्व्हेशन काऊंटरवरील तिकीट बुकिंगच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पहिल्याप्रमाणे रेल्वे तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या १० मिनिटात रेल्वेचे अधिकृत एजंट बुकिंग करू शकणार नाहीत. म्हणजे १५ मिनिटे आधार वेरिफाय वापरकर्ते आणि त्यानंतर १० मिनिटांपर्यंत सर्वसामान्य प्रवाशांना एजंटांपेक्षा प्राधान्य मिळेल. 11 / 12IRCTCने ०१ जुलैपासून तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी आधार वेरिफेकशन आवश्यक केले होते. आधार वेरिफिकेशन ज्यांनी केलं त्यांनाच तात्काळ तिकीट बुक करता येते. 12 / 12तात्काळ तिकीट प्रवाशांना उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढल्याचे म्हटले जात आहे. आता रेल्वेने आधार वेरिफिकेशनची व्याप्ती वाढण्याचा निर्णय घेतला आहे.