शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा देशातील या इन्श्युरन्स कंपनीवर 'विश्वास', किती गुंतवणूक केलीय पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 2:53 PM

1 / 6
गुजरातमध्ये विक्रमी विजय मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे भूपेंद्र पटेल आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. भूपेंद्र पटेल हे देशातील अशा मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत ज्यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला. भूपेंद्र पटेल यांचा दूरदर्शीपणा केवळ राजकारणातच नाही तर गुंतवणुकीच्या आघाडीवरही दिसून येतो.
2 / 6
गुजरात निवडणुकीसाठी त्यांनी भरलेले निवडणूक प्रतिज्ञापत्र पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते की भूपेंद्र पटेल यांचा देशातील सरकारी विमा कंपनी LICवर खूप विश्वास आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार भूपेंद्र पटेल यांनी ६२,५७,१७१ रुपयांचा विमा काढला आहे.
3 / 6
गुजरात निवडणुकीच्या २००२ च्या प्रतिज्ञापत्रानुसार भूपेंद्र पटेल यांचा शेअर बाजार, डिबेंचर, टपाल बचत योजना यासारख्या गोष्टींमध्ये गुंतवणूक केलेली नाही. म्हणजे पटेल यांनी शेअर्स, डिबेंचर्समध्ये एक रुपयाही गुंतवलेला नाही.
4 / 6
विम्याव्यतिरिक्त, जर आपण बँक खात्यांबद्दल बोललो तर येथे त्यांच्या नावावर तीन खाती दाखवली गेली आहेत. ज्यामध्ये एक पंजाब नॅशनल बँक आणि दोन स्टेट बँक ऑफ इंडिया खाती आहेत. या तिन्ही खात्यांमध्ये त्यांनी सुमारे ११.१९ लाख रुपये जमा केले आहेत.
5 / 6
सोने-चांदी आणि हिऱ्यांबद्दल बोलायचे झाल्यास भूपेंद्र पटेल यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे १०७ ग्रॅम हिरे आणि ९५० ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. त्याचबरोबर ३६५० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या दागिन्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. या दागिन्यांची किंमत सुमारे ७४ लाख रुपये दाखवण्यात आली आहे. वाहनांबद्दल बोलायचे झाल्यास पटेल यांच्या नावावर फक्त एक अॅक्टिव्हा दाखवण्यात आली आहे, ज्याची किंमत ४२,८६५ रुपये इतकी आहे.
6 / 6
भूपेंद्र पटेल यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर गुजरात निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती ८,२२,८०,६८८ रुपये दाखवण्यात आली आहे. तर कर्ज १,५३,१०,६८० रुपये दाखवण्यात आले आहे. शिक्षणाबाबत बोलायचे झाले तर या प्रतिज्ञापत्रानुसार गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे १२वी उत्तीर्ण आहेत.
टॅग्स :Bhupendra Patelभूपेंद्र पटेल