'बँक सखी' बनून दरमहा ४० हजार कमावताहेत ग्रामीण भागातील महिला; नेमकी स्कीम काय? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 13:44 IST
1 / 9'बँक सखी' योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना 'बँक सखी' म्हणून नियुक्त केलं जातं आणि या महिला गावकऱ्यांच्या बँकांशी निगडीत सर्व समस्या निवारण करण्याचं काम करतात. ज्या व्यक्ती बँकेत जाऊ शकत नाहीत किंवा बँक त्यांच्या राहत्या घरापासून खूप दूर आहे अशा लोकांना मदत करण्याचं काम या 'बँक सखी' करतात.2 / 9उत्तर प्रदेशात 'बँक सखी' योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. देशातील इतर राज्य देखील आपल्या राज्यातील ग्रामीण महिलांना सक्षम करण्यासाठी या योजनेवर भर देऊ शकतात. उत्तर प्रदेशात गेल्यावर्षी या योजनेला सुरुवात करण्यात आली होती. 3 / 9 'बँक सखी' म्हणून नियुक्त केल्या जाणाऱ्या महिलांना पहिले सहा महिने दरमहा ४ जार रुपयांचं मानधन दिलं गेलं. त्यासोबतच लॅपटॉप खरेदीसाठी सराकारकडून ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. 4 / 9लॅपटॉपमुळे बँकांची कामं बँक सखींना गावाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून आणि ग्राहकांच्या अगदी घरी जाऊन करता येऊ लागली. 'बँक सखी' नियुक्त ग्रामीण महिलांचंही 'वर्क फ्रॉम होम' सुरू झालं.5 / 9देशातील अनेक भागांमध्ये 'बँक सखी' योजना ग्रामीण महिलांसाठी वरदान ठरत आहे. भोपाळच्या राजगड जिल्ह्यातील 'बँक सखी' म्हणून काम करत असणाऱ्या ज्योतीनंही यासंदर्भातील भावना व्यक्त केल्या. 'बँक सखी'मुळे पूर्णपणे स्वावलंबी होण्यास मदत झाली असं त्या सांगतात.6 / 9बँक सखी योजनेमुळे आर्थिक मदत सुरू झाली आणि कुटुंबीयांची आर्थिक गरज पूर्ण झाली. काम करता करता आता त्यांना शिक्षण देखील घेता येत आहे. एमए केल्यानंतर ज्योती यांनी आता एलएलबीचं शिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय त्यांच्याच पगारावर आता घर चालत आहे. 7 / 9कोरोना महामारीच्या काळात देखील गावागावात जाऊन एक कोटींपेक्षाही अधिक रुपयांचं ट्रान्झाक्शन केल्याचं ज्योती सांगतात. लोकांची मदत होत असल्यानं त्याचंही खूप समाधान मनाला मिळतं, असंही त्या म्हणाल्या. 8 / 9'बँक सखी'च्या माध्यमातून काही ठराविक मानधन मिळत नसलं तरी प्रत्येक ट्रान्झाक्शनवर कमीशन स्वरुपात खूप चांगले पैसे मिळतात. दरमहा जवळपास ४० हजार रुपयांची कमाई मी करते, असं ज्योती सांगतात. घर चालवण्यासाठी इतकी कमाई माझ्यासाठी खूप आहे. 'बँक सखी' पदावर काम करण्यासाठी त्यांनी बँकेकडून ट्रेनिंग घेतलं आहे आणि त्यानंतर लॅपटॉप घेऊन त्यांनी गावातूनच काम कऱण्यास सुरुवात केली. 9 / 9बँकेत जाणं ज्यांना शक्य होत नाही किंवा बँक खूप दूर आहे. अशा बँकेच्या ग्राहकांना बँकिंग संदर्भातील कामांसाठी ज्योती त्यांना मदत करतात. यात बँकेतून पैसे काढणं, पैसे भरणं अशा सुविधांचा देखील समावेश आहे.