शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

अमोलने महाराष्ट्रातून नेले धुराचे फटाके; अशी झाली संसदेत घुसखोरीची प्लॅनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 13:22 IST

1 / 13
संसदेतील घुसखोरीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आत्तापर्यंयत पोलिसांनी ६ जणांना अटक केली असून संपूर्ण घटनेचा तपास करण्यात येत आहे.
2 / 13
संसदेच्या कामकाजादरम्यान सभागृहात घुसलेल्या दोघांचे नाव सागर शर्मा आणि मनोरंजन डी असे आहे. तसेच, त्यांच्या दोन साथीदारांना संसदेबाहेर पकडण्यात आले. नीलम आणि अमोल शिंदे अशी त्यांची नावे आहेत.
3 / 13
सर्वांनी संसदेत घुसकोरीचा नियोजित प्लॅन आखला होता. त्यासाठी, यापूर्वी दोघांनी रेकीही केली होती. तर, धूर सोडणारे फटाके अमोलन महाराष्ट्रातून दिल्लीत आणले होते.
4 / 13
संसदेत दोघांनी उड्या मारल्यानंतर सभागृहात आणि भवनाबाहेर धुराचे लोट सोडण्यात आले. चौघानीही 'हुकूमशाही चालणार नाही', 'भारत माता की जय' आणि 'जय भीम, जय भारत' अशा घोषणा दिल्या.
5 / 13
यापकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयपीसी ४५२ (ट्रेसपासिंग) आणि 120-B (गुन्हेगारी कट ) यांसह UAPA शी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
6 / 13
अशी ठरली योजना - सोशल मीडिया पेज भगत सिंह फॅन क्लबशी हे सर्व आरोप जोडले गेले होते. म्हैसूर याठिकाणी दीड वर्षापूर्वी या सगळ्यांची भेट झाली होती. त्यानंतर, ९ महिन्यांनी ते पुन्हा एकदा भेटले. त्यावेळी त्यांनी संसदेत घुसकोरी करण्याचा कट रचला.
7 / 13
यावर्षी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी मनोरंजन डी हा आरोपी बंगळुरुतून आला होता. त्याने व्हिजिटर पास घेतला आणि संसदेची रेकी केली होती.
8 / 13
जुलै महिन्यात सागर लखनौहून दिल्लीला आला. मात्र त्याला संसद भवनात जाता आलं नव्हतं. त्याने संसदेची बाहेरुन रेकी केली होती.
9 / 13
रेकीच्या वेळी मनोरंजन डी ला हे समजलं की संसदेत प्रवेश करताना बूट तपासले जात नाहीत.१० डिसेंबरला हे सगळेजण एक – एक करुन आपल्या राज्यांमधून दिल्लीला आहे. मनोरंजन हा विमानाने दिल्लीला आला.
10 / 13
सगळे आरोपी १० डिसेंबरच्या रात्री गुरुग्राम या ठिकाणी विक्की आणि वृंदा यांच्या घरी पोहचले होते. त्यावेळी उशिरा ललित झा हा तरुणही तिथे पोहचला होता.
11 / 13
अमोल शिंदे हा तरुण महाराष्ट्रातला आहे. तो महाराष्ट्रातून धूर असलेले फटाके घेऊन आला होता. सागर शर्मा याने १३ डिसेंबरच्या सकाळी ९ वाजता खासदार प्रताप सिन्हा यांच्या स्वीय सचिवाकडून पास मिळवला.
12 / 13
सगळे आरोपी इंडिया गेट या ठिकाणी भेटले होते. त्याच ठिकाणी अमोलने सगळ्यांना धुराचे फटाके दिले होते. सागर शर्मा आणि मनोरंजन १३ डिसेंबरच्या दुपारी १२ च्या आसपास संसदेच्या आत गेले.
13 / 13
अमोल आणि नीलम हे दोघं संसदेच्या बाहेर थांबले आणि त्यांनी घोषणा सुरु केल्या. ललित झा हा त्यांचा व्हिडीओ बनवत होता. सिग्नल नावाच्या अॅपने हे सगळे एकमेकांशी जोडले गेले होते. हंगामा झाल्यानंतर ललित सगळ्यांचे मोबाइल घेऊन फरार झाला.
टॅग्स :laturलातूरParliamentसंसदlok sabhaलोकसभाfire crackerफटाके