शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

IPS नोकरी सोडून अचानक लंडनला गेलेली ही महिला अधिकारी कोण?; सरकारकडून राजीनामा मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:57 IST

1 / 8
दरवर्षी लाखो युवक आयएएस आणि आयपीएस बनण्याचं स्वप्न पाहत असतात, ज्याला त्यात यश मिळते ते नशिबवान मानले जातात. परंतु सध्याच्या काळात या पदांवर पोहचल्यानंतर काही अधिकाऱ्यांचा नोकरीतून मोहभंग होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
2 / 8
अलीकडेच यूपी कॅडरमधील महिला आयपीएस अधिकाऱ्याने पदाचा राजीनामा दिला. ज्याला आता केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. आता ही अधिकारी कोण, आयपीएस पदावर कार्यरत असताना त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय का घेतला जाणून घेऊया.
3 / 8
ही कहाणी आहे IPS अधिकारी अलंकृता सिंह, सरकारी वेबसाईटनुसार, अलंकृता सिंह या मूळच्या झारखंडमधील जमशेदपूरच्या आहेत. ४ ऑक्टोबर १९७९ साली त्यांचा जन्म झाला. २००२ साली इलाहाबाद विद्यापीठातून एमएससीचं शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २००८ साली अलंकृता सिंह आयपीएस अधिकारी बनल्या.
4 / 8
यूपीएससी परीक्षेची तयारी करताना २००७ साली त्यांची निवड झाली. १ वर्षाच्या ट्रेनिंगनंतर त्यांना यूपी कॅडर बॅचमधून नियुक्तीस्थळ मिळालं. आईनं दिलेल्या सल्ल्यामुळे या पदापर्यंत पोहचले असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. अलंकृता सिंह उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात तैनात होत्या. सुल्तानपूरसह अन्य जिल्ह्यात त्या पोलीस अधीक्षक पदावर होत्या.
5 / 8
२०१७ साली अलंकृता सिंह केंद्रीय प्रतिनियुक्तीवर गेल्या. त्या काळात मसूरीच्या लाल बहादुर शास्त्री नॅशनल अकॅडमीवर डिप्टी डायरेक्टर म्हणून त्या कार्यरत होत्या. ५ एप्रिल २०२० पर्यंत त्या या पदावर तैनात होत्या. त्यानंतर त्यांना पुन्हा उत्तर प्रदेशात पाठवण्यात आले. तिथून त्या दीड महिन्याच्या सुट्टीवर गेल्या.
6 / 8
अलंकृता सिंह यांची नियुक्ती महिला बाल सुरक्षा विभागात एसपी पदावर झाली. १९ फेब्रुवारी २०२१ ला त्यांना कॉल केला असता त्या लंडनमध्ये होत्या. २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत त्या कामावर आल्याच नाहीत. त्यानंतर शासनाने एप्रिल २०२२ मध्ये त्यांच्यावर कारवाई करत निलंबित केले. शासनाच्या परवानगीशिवाय त्या परदेशात गेल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.
7 / 8
शासनाने निलंबित करताच अलंकृता सिंह यांनी विभागाला त्यांचा राजीनामा पाठवला. हा राजीनामा आता शासनाने मंजुर केला. या राजीनाम्याची प्रत केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवून लवकरच त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी घेतली जाणार आहे. अलंकृता सिंह यांचे पती विद्या भूषण हेदेखील आयएएस अधिकारी आहेत. काही काळाआधी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
8 / 8
सूत्रांनुसार, अलंकृता सिंह यांना खासगी क्षेत्रात त्यांचं करिअर बनवायचं आहे म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले. अलंकृता सिंह आणि त्यांचे पती दोघेही सध्या लंडनमध्ये असून तिथे एका यूनिवर्सिटीत कार्यरत आहेत.