२३ किलो सोन्याची बिस्कीटे आणि दागदागिने, भाजपा उमेदवाराच्या भावाच्या घरातून अब्जावधीची संपत्ती जप्त
By बाळकृष्ण परब | Updated: October 17, 2020 20:05 IST
1 / 6बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. यादरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 2 / 6बिहारमधील रक्सौल मतदारसंघातील भाजपा उमेदवार प्रमोदकुमार सिन्हा यांच्या भावाच्या घरातून २२ किलो ५७६ ग्रॅम सोन्याची बिस्किटे आणि दोन किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई नेपाळ पोलिसांनी केली आहे. प्रमोदकुमार सिन्हा यांचे भाऊ अशोक सिन्हा हे रक्सौलच्या शेजारी असलेल्या नेपाळमधील पर्सा जिल्ह्यात राहतात. पोलिसांनी त्यांच्या घरी छापा घातल्यानंतर पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. 3 / 6प्रमोदकुमार सिन्हा यांनी ३ कोटी रुपये देऊन विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळवल्याची चर्चा सुरू झाली होती. तसेच कुणीतरी नेपाळी व्यापारी त्यांना पैसे पुरवत असल्याचे सांगण्यात येत होते. आता त्यांच्या घरी पडलेल्या धाडीमुळे स्थानिक नागरिकांना धक्का बसला आहे.4 / 6प्रमोद कुमार सिन्हा यांचे भाऊ अशोक सिन्हा यांच्या नेपाळमधील पर्सा जिल्ह्यात असलेल्या घरावर पोलिसांनी धाड घातली होती. बीरजंग महानरगपालिका वॉर्ड क्रम ५, रेशिमकोठी स्थिती गणेश अपार्टमेंटमधील फ्लॅट क्र. ३०३ वर छापेमारी करण्यात आली. हा फ्लॅट अशोक सिन्हा यांचा आहे. 5 / 6 नेपाळ पोलिसांनी केलेल्या छापेमारीदरम्यान २२ किलो ५७६ ग्रॅम सोन्याची बिस्किटे, दागदागिने आणि दोन किलो २६३ ग्रॅम चांदी सापडली. याबाबत पर्सा जिल्ह्याचे पोलिस कप्तान गंगा पंथ यांनी यांनी पत्रकाच्या माध्यमातून सांगितले की, अशोक सिन्हा यांच्या फ्लॅटवर टाकलेल्या छाप्यामधून सोने आणि चांदी जप्त करण्यात आली. 6 / 6प्रमोद सिन्हा यांना चार भाऊ आहेत. या सर्वांचे मूळ घर रक्सौलमधील हरैया गावात आहे. नेपाळ पोलिसांनी गुप्त सूचनेच्या आधारावर प्लॅटवर धाड घातली होती. ही कारवाई करण्यात आली. तेव्हा या घरात कुणीही नव्हता. त्यामुळे घराते ताळे तोडून आतील सोने-चांदी जप्त करण्यात आली.