1 / 8 जगभरातील २१२ देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. मागील २४ तासात ७९,८७५ नवीन कोरोनाच्या केसेस समोर आल्या आहेत. तर २४ तासात ३,५१० लोकांना कोरोनामुळं जीव गमवावा लागला आहे. 2 / 8कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात २ लाख ८३ हजार ७३४ वर पोहोचली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या ४२ लाखांजवळ गेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात १४ लाख ९० हजार ४४४ रुग्ण बरे झाले आहेत. जगातील ७३ टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत. 3 / 8भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशात कोरोनामुळे मृत्यूची संख्या २ हजार १०९ झाली आहे तर कोरोनाग्रस्तांची संख्या ६२ हजार ९३९ पर्यंत पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, गेल्या २४ तासांत १२८ लोकांचा मृत्यू झाला तर ३ हजार २७७ रुग्ण आढळले आहेत.एकीकडे दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे.4 / 8कोरोनावर मात करण्यासाठी अजूनही अधिकृत औषधं निर्माण झालेलं नसलं तरी विविध देशातील संशोधक मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. मात्र उत्तर प्रदेशमधील अवघ्या २३ दिवसांच्या मुलाने आपल्या आईच्या दुधाच्या सहाय्याने कोरोनावर मात केली असल्याचे समोर आले आहे.5 / 8२३ दिवसांच्या या लहान मुलाला २० मार्चला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले होते. यानंतर एसएन मेडिकल कॉलेजच्या आइशोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते.6 / 8हा रुग्ण डॉक्टरांसाठी खास होता, म्हणून त्यासाठीही तशी खास व्यवस्था करण्यात आली होती. या मुलासह त्याची आईची देखील विशेष काळजी घेण्यात येत होती. मुलाची आई निगेटिव्ह असल्यामुळे ती रुग्णालयात आपल्या मुलासोबत पीपीई किट परिधान करुन राहत होती. 7 / 8 मुलाची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी त्यामध्ये कोणतेही लक्षणं आढळून येत नव्हती. त्यामुळे डॉक्टरांना देखील कोणते औषधं द्यावी असा प्रश्न निर्माण झाला. मुलामध्ये लक्षणं दिसण्यासाठी डॉक्टरांनी थोडी वाट बघण्याचा निर्णय घेतला. 8 / 8लहान मुलाला आईचं दुध दिलं जात असल्यामुळे आईला फळं, हिरव्या भाज्या, कोथिंबीर, दुधासह पौष्टिक आहार देण्यात आला. बाळाला दिवसातून पाच ते सात वेळा दुध पाजण्यात येत होते. मात्र काही दिवसांनंतर या मुलाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने डॉक्टर देखील चक्रावून घेले. १४ दिवसांत लहान मुलाचे कोरोनाचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला रुग्णालयातून टाळ्यांच्या गजरात निरोप दिला.