शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमेरिकेने बाहेर काढलेल्या भारतीयांमध्ये १९ महिला, १३ अल्पवयीन; डबल पैसे खर्च करुन सोडून गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 13:38 IST

1 / 11
विविध राज्यांमधून १०४ बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन अमेरिकन हवाई दलाचे सी-१७ ग्लोबमास्टर विमान बुधवारी दुपारी १.५५ वाजता अमृतसर विमानतळावर उतरले. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरीतांवर कारवाई केल्यानंतर पहिले विमान भारतात पोहोचले.
2 / 11
बुधवार ५ फेब्रुवारी २०२५ रोजी पंजाब पोलिसांचे एक पथक अमृतसर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अमेरिकेतून आलेल्या नागरिकाला घेऊन जात आहेत.
3 / 11
पंजाबमधील निर्वासितांना अमृतसर विमानतळावरून संबंधित पोलीस पथकांनी सरकारी वाहनांमधून घेऊन नेले. अमेरिकेचे विमान आल्यानंतर पंजाब पोलीस आणि गुप्तचर संस्थांसह अनेक सरकारी संस्थांनी त्यांची चौकशी केली आणि त्यांचा गुन्हेगारी इतिहास पडताळला.
4 / 11
पंजाबचे कॅबिनेट मंत्री कुलदीप सिंग धालीवाल यांनी बुधवारी अमृतसरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वरण या हद्दपार झालेल्या तरुणाची भेट घेतली.
5 / 11
अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहत असलेल्या काही भारतीय नागरिकांना हद्दपार करण्यात आले आहे. यातील काही प्रवासी गुरुवार ६ फेब्रुवारी २०२५ रोजी ते गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर पोहोचले. सुरक्षा कर्मचारी विमानतळावरून हद्दपार झालेल्यांना सुरक्षितपणे घेऊन जात आहेत.
6 / 11
गुरुवारी ६ फेब्रुवारी २०२५ रोजी अहमदाबाद विमानतळावर पोहोचल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अमेरिकेतून हद्दपार केलेल्या गुजराती नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. हद्दपार झालेल्यांमध्ये १९ महिला आणि १३ अल्पवयीन मुले होती, यात एक ४ वर्षांचा मुलगा आणि ५ आणि ७ वर्षांच्या दोन मुलींचा समावेश आहे..
7 / 11
या फोटोमध्ये अमेरिकेतून हद्दपार केलेले गुजराती रहिवासी गुरुवार ६ फेब्रुवारी २०२५ रोजी अहमदाबाद विमानतळावर पोहोचले आहेत. माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी हद्दपार केलेल्या गुजराती लोकांबद्दल सहानुभूती व्यक्त केली, ते म्हणाले की, ते नोकरीच्या शोधात अमेरिकेत गेले होते, त्यांना गुन्हेगार म्हणून लेबल लावू नये.
8 / 11
६ फेब्रुवारी २०२५ रोजी अमेरिकेतून हद्दपार झालेला एक भारतीय स्थलांतरित अहमदाबाद विमानतळावर पोहोचला. मुले आणि महिलांसह ३३ निर्वासितांना पोलिसांच्या वाहनांमधून गुजरातमधील त्यांच्या मूळ गावी सोडण्यात आले.
9 / 11
अहमदाबादमधील विमानतळावरून बाहेर पडताना अमेरिकेतून हद्दपार झालेल्या एका भारतीय स्थलांतरिताला सुरक्षा कर्मचारी घेऊन जात आहेत. गुजरातमधून हद्दपार झालेल्यांच्या कुटुंबीयांनी दावा केला की, त्यांचे नातेवाईक अमेरिकेत कसे पोहोचले याची त्यांना माहिती नव्हती.
10 / 11
अमेरिकेतून हद्दपार केलेले भारतीय स्थलांतरित गुरुवारी अहमदाबाद विमानतळावरून बाहेर पडले. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, बहुतेक हद्दपार केलेले लोक मेहसाणा, गांधीनगर, पाटण, वडोदरा आणि खेडा जिल्ह्यातील आहेत.
11 / 11
अमेरिकेतून हद्दपार झालेल्या एका मास्क घातलेल्या स्थलांतरित महिलेला बुधवारी अमृतसर येथे अमेरिकन लष्करी विमानाने सोडले. ती महिलाही गुजरातची आहे.
टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प