शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

मालेगावात हिरे समर्थक खैरनार बंधूंवर प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 20:09 IST

1 / 5
मालेगाव (नाशिक) : येथे शिवसेना व भाजपात राडा झाला. पंचायत समितीचे भाजपाचे सदस्य तसेच भाजपा नेते अद्वय हिरे यांचे समर्थक विकी खैरनार व त्यांचे लहान बंधू लकी खैरनार यांच्या गाड्या सोमवारी रात्री कॅम्प रस्त्यावरील वनविभागाच्या कार्यालयासमोर अडवून वाहनांची तोडफोड केली.
2 / 5
खैरनार बंधूंना हॉकी, ब्याट, लाकडी दाडक्यांनी प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे, राहुल गायकवाड, विकी चव्हाण या तिघांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
3 / 5
याप्रकरणी गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या पं. स. सदस्य खैरनार यांच्यावर धुळे येथील जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
4 / 5
दरम्यान, पंचायत समितीचे भाजपाचे सदस्य गणेश खैरनार व प्रसाद खैरनार यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ व या मारहाण प्रकरणातील संशयित अविष्कार भुसे, राहूल गायकवाड, विकी चव्हाण यांना तातडीने अटक करावी या मागणीसाठी प्रांत कार्यालयावर भाजपा पदाधिकारी व हिरे समर्थकांनी मुकमोर्चा काढला होता.
5 / 5
यावेळी प्रांताधिकारी अजय मोरे, तहसीलदार ज्योती देवरे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. मोर्चाला हिरे यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून प्रारंभ झाला. मोर्चा कॉलेजरोड मार्गे प्रांत कार्यालयावर काढण्यात आला.
टॅग्स :Nashikनाशिक