शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

‘उमराव’ मैदानात डोळ्यांची पारणे फेडणारं जवानांचं सशस्त्र संचलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 21:05 IST

1 / 6
नाशकात तोफांच्या साक्षीने शपथ घेत 333 जवानांची (गनर) तुकडी ‘उमराव’ मैदानातून भारतीय तोफखान्यात दाखल झाली. (सर्व छायाचित्रं : निलेश तांबे)
2 / 6
‘मैं दृढ प्रतिज्ञा करता हूं की, कानून द्वारा निश्चित किये गये भारतीय संविधान का सच्चे मन से वफादार रहुंगा...’ अशी शपथ घेतली. निमित्त होते, नाशिकरोड येथील भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या शपथविधी सोहळ्याचे.
3 / 6
४२ आठवड्यांचे कठोर प्रशिक्षण देत एका साध्या युवकाला उत्कृष्ट सैनिक म्हणून घडविणाऱ्या आपल्या गुरूंसोबतची आठवण ‘सेल्फी’त एका जवानानं कैद केली.
4 / 6
यावेळी जवानांनी केलेले सशस्त्र संचलन डोळ्यांची पारणे फेडणारे होते. यावेळी तोफखान्याच्या बॅन्ड पथकाने वाजविलेली विविध देशभक्तीपर धूनने जवानांचा उत्साह वाढविला.
5 / 6
यावेळी मुख्य अतिथी म्हणून विशिष्ट सेवा पदक विजेते स्कूल ऑफ आर्टिलरीच्या गनरी शाखेचे मुख्य प्रशिक्षक मेजर जनरल पी. रमेश उपस्थित होते.
6 / 6
परेडच्या समारोपानंतर भारत माता की जय असा जयघोष करत भारतीय सेनेत दाखल झाल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला.