शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बारामतीमध्ये पुन्हा काका विरुद्ध पुतण्या, माळेगाव कारखान्याची निवडणूक लढण्याचे युगेंद्र पवारांनी दिले संकेत

By संतोष कनमुसे | Updated: March 15, 2025 19:57 IST

1 / 10
विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली. या मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या अशी लढत झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार लढत झाली.
2 / 10
या निवडणुकीत अजित पवार यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. विधानसभेआधी लोकसभा निवडणुकीतही खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत झाली होती. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला.
3 / 10
दरम्यान, बारामतीमध्ये आता पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे. माळेगाव सहकारी कारखान्याची निवडणूक काही दिवसातच होणार आहे. ही निवडणूक लढण्याचे संकेत युगेंद्र पवार यांनी दिले आहेत.
4 / 10
माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर विविध मागण्यांसाठी आंदोलन झाले.
5 / 10
या आंदोलनाबाबत युगेंद्र पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. युगेंद्र पवार म्हणाले, माळेगाव कारखान्याचे प्रश्न लोकांनी पवार साहेबांपुढे मांडले.
6 / 10
'हे आंदोलन शरद पवार गटाचे होते असे नाही. सगळ्या पक्षातील सभासदांनी मिळून आंदोलन केले आहे. त्यांचे प्रश्न गंभीर आहेत. कामगारांचे पगार दिलेले नाहीत, नदीच पाणी दूषित केले आहे, असंही युगेंद्र पवार म्हणाले.
7 / 10
युगेंद्र पवार म्हणाले, शरद पवार यांनी या क्षेत्रात मोठं काम केले आहे. माळेगाव कारखान्याचे पवार साहेब सभासद आहेत, असंही युगेंद्र पवार म्हणाले.
8 / 10
नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी शरद पवार नेहमी आणत आहेत. आता ऊसाच्या उत्पादनासाठी एआय तंत्रज्ञान आणले आहे.
9 / 10
मी दोन-तीन दिवसापूर्वी खांडस या गावात गेलो होतो. त्या गावात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. याचे कारण म्हणजे पाणी आहे. पाणी कूप दूषित झाले आहे. कारखान्याचे सांडपाणी हे केमिकल मिक्स असते. यामुळे पाणी दूषित होत आहे, असा आरोप युगेंद्र पवार यांनी केला.
10 / 10
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढणार का? या प्रश्नावर बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, कार्यकर्त्यांनी आम्हाला भरपूर साथ दिली आहे. फक्त लोकसभेलाच नाही तर विधानसभेलाही त्यांनी आम्हाला साथ दिली.त्यामुळे कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या पाठिमागे उभं रहावे लागेल, असे सांगत युगेंद्र पवार यांनी निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
टॅग्स :yugendra pawarयुगेंद्र पवारAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारBaramatiबारामती