शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 21:01 IST

1 / 5
पवार कुटुंबात यावर्षी दोन मंगल सोहळे पार पडणार आहेत. अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांच्यापाठोपाठ श्रानिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांचेही लग्न ठरले आहे. युगेंद्र पवारांचा साखरपुडा नुकताच पार पडला.
2 / 5
काही दिवसांपूर्वी युगेंद्र पवार यांनी लग्नाबद्दलची गुडन्यूज दिली होती. रविवारी (३ ऑगस्ट) मुंबईमध्ये युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा झाला.
3 / 5
या कार्यक्रमानिमित्ताने पवार कुटुंबीय एकत्र आले होते. युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांच्या साखरपुड्याचे फोटोही समोर आले आहेत. प्रभादेवी येथील इंडिया बुल्स इमारतीत हा कार्यक्रम पार पडला.
4 / 5
तनिष्का कुलकर्ण या मुंबईकर आहेत. त्यांचे वडील उद्योगपती आहेत. मुंबईतील प्रभादेवी परिसरात त्या राहतात.
5 / 5
तनिष्का यांचे शिक्षण मुंबईतच झाले आहे. उच्च शिक्षण त्यांनी परदेशात घेतले. लंडनमधील कास बिझनेस स्कूलमधून त्यांनी फायनान्स विद्या शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
टॅग्स :yugendra pawarयुगेंद्र पवारmarriageलग्नhusband and wifeपती- जोडीदार