By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 17:52 IST
1 / 6राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या, धडाकेबाज खासदार सुप्रिया सुळे यांचं वेगळंच रूप पैठण इथल्या संवाद मेळाव्यात पाहायला मिळालं. विधानसभा निवडणुकीत तिकीट कापलं गेलेल्या संजय वाघचौरे यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी गोंधळ घातला, तर दत्ता गोर्डे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार घोषणाबाजी केली. हा प्रकार पाहून सुप्रिया सुळे यांचा पारा चढला आणि त्यांनी कार्यकर्त्यांना दमच भरला! 2 / 6'माझ्या बापाने रक्ताचं पाणी करून हा पक्ष वाढवला आहे याचं भान कार्यकर्त्यांनी ठेवावं'' 3 / 6''राष्ट्रवादी पक्षाचं नाव खराब होईल, असा प्रयत्न करणाऱ्याला माफ करणार नाही.''4 / 6''ही हुल्लडबाजी मी पहिल्यांदा पाहिली आहे. हे मी खपवून घेणार नाही'' 5 / 6''मी कुठल्या बापाची लेक आहे, हे समजून घ्या.'' 6 / 6''माझ्या बैठकीत पहील्यांदा असा गोंधळ झाला. ही बैठक माझ्यासाठी कायम कटू आठवणीत राहील.''