खा. संजय राऊत यांची 'ही' पाच विधानं वाचून तुम्हीही म्हणाल, 'कुछ तो गडबड है'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 17:00 IST
1 / 6लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. भाजपा-शिवसेना युती होणार की नाही, याबद्दलची उलटसुलट चर्चाही रोज सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना खासदारांची एक बैठक 'मातोश्री'वर झाली. विशेष म्हणजे, राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जाणारे, २०१४च्या नरेंद्र मोदींच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावलेले जेडीयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोरही यावेळी उपस्थित होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी युतीबाबत स्पष्टपणे बोलणं टाळलं असलं, तरी सेनेची पावलं युतीच्या दिशेनं पडत असल्याचं त्यांच्या पाच विधानांमधून स्पष्ट जाणवतं. तुम्हीही बघा, काय वाटतंय ते... 2 / 6उद्धव ठाकरे सगळी समीकरणं, गणितं जुळवत आहेत!3 / 6प्रशांत किशोर यांच्याशी काय बोलणं झालं, यावर संजय राऊत म्हणाले, 'बातें तो बहोत होती है, धीरे धीरे आपको पता चलेगा'4 / 6शिवसेना कायमच मोठ्या भावाच्याच भूमिकेत राहिलीय!5 / 6वेट अँड वॉच!6 / 6हा काही व्यापार नाही. कुणी मध्यस्थी करायची गरज नाही. उद्धव ठाकरे पुरेसे आहेत!