SBI देत आहे 5 लाख रोख जिंकण्याची संधी; असा करा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 20:57 IST
1 / 7देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर आणली आहे. याद्वारे तब्बल 5 लाख रुपये तेही रोखीने जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. यासाठी ग्राहकांना एका स्पर्धेमध्ये भाग घ्यावा लागणार आहे. 2 / 7महत्वाचे म्हणजे तुम्ही या स्पर्धेमध्ये एकटे किंवा सांघिकरित्या सहभागी होऊ शकता. एसबीआयने हॅकेथॉनचे आयोजन केले आहे. यामध्ये तुम्हाला बँकेला काही उपाय सुचवावे लागणार आहेत. ‘SBI - Predict for Bank 2019’ असे नाव ठेवण्यात आले आहे. 3 / 7विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी हे कर्ज बुडवून पसार झाले आहेत. यामध्ये बँकांचे काही हजार करोड रुपये बुडाले आहेत. यामुळे अशा लोकांना कर्ज घेतल्यानंतर पळून जाण्यापासून कसे रोखता येईल याबाबत उपाय सुचवावे लागणार आहेत. 4 / 7या हॅकेथॉनसाठी 24 जानेवारीपासून नोंदणी सुरु झाली असून उद्या 7 फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे. टीमने सहभाग घ्यायचा असेल तर जास्तीतजास्त 4 जण भाग घेऊ शकतात. 5 / 7नोंदणी केल्यावर 12 फेब्रुवारीपासून 5 मार्च पर्यंत तुम्ही उपाय सुचवायचे आहेत. यानंतर दोन जणांची रोख बक्षिसासाठी निवड केली जाणार आहे. यामध्ये विजेत्याला 5 लाख आणि उपविजेत्याला 4 लाख रुपये देण्यात येणार आहेत. 6 / 7या हॅकेथॉनमध्ये लोन देण्यासाठी कोणत्या अटी आणि पडताळणी कराव्यात याचे बँकेला उपाय सांगावे लागणार आहेत. 7 / 7या हॅकेथॉनमध्ये भाग घ्यायचा असल्यास खालील लिंकवर क्लिक किंवा कॉपी करावे. https://sbi.stockroom.io/register