1 / 6 महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सध्या संवर्धनाचं काम सुरू आहे. 2 / 6मंदिराच्या संवर्धनाच्या कामादरम्यान मंदिराच्या अंतर्भागात नव्याने करण्यात आलेलं बांधकाम हटवण्यात आल्याने मंदिराचं जुनं सुंदर स्वरूप समोर आलं आहे. 3 / 6सुमारे ७०० वर्षांपूर्वीचं मंदिराचं दगडी बांधकाम, त्यावरील आखीवरेखीव कलाकुसर पाहून भक्तांचं मन तृप्त होत आहे. 4 / 6दरम्यान, मंदिराच्या संवर्धनाच्या कामामुळे १५ मार्च पासून विठूमाऊलींचं चरण स्पर्श दर्शन बंद होतं. या काळात मर्यादित कालावधीसाठी माऊलींचं मुखदर्शन सुरू होतं. 5 / 6संवर्धनाच्या कामानंतर आता विठू माऊलींसोबतच मंदिरातील गाभारा आणि मुख्य गाभारा याचं दर्शनही भाविकांना होणार आहे. 6 / 6आता २ जूनपासून भाविकांना विठूमाऊलीचं चरणपददर्शन घेता येणार आहे. मात्र मंदिराच्या सुशोभिकरणाचं काम पूर्ण होण्यास अजून काही कालावधी लागणार आहे.