एकूण किती संपत्तीचे मालक आहेत एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 19:33 IST
1 / 11महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांचे एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावरील हल्ले सुरूच आहेत. त्यांनी आज, वानखेडे हे 1 लाख रुपयांची पॅन्ट, 70 हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीचा शर्ट आणि 25-50 लाख रुपयांच्या घड्याळी वापरतात, असा मोठा दावा केला आहे. (Nawab Malik Vs Sameer Wankhede)2 / 11‘‘एक प्रामाणिक अधिकारी एवढे महागडे कपडे कसे खरेदी करू शकतो? त्यांनी इतर लोकांना चुकीच्या पद्धतीने अडकवून कोट्यवधी रुपयांची वसुली केली आहे,’’ असा नवाब मलिक यांनी म्हटले आहे.3 / 11मलिक म्हणाले, एनसीबी अधिकाऱ्याकडे काम करण्यासाठी खाजगी सैन्य आहे. एवढेच नाही, तर नवी मुंबईतील रायगड जिल्ह्यात असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदरात (जेएनपीटी) गेल्या १५ दिवसांपासून ड्रग्जचे तीन कंटेनर पडून असल्याचा दावाही मलिक यांनी केला. तसेच, यावर महसूल गुप्तचर विभागाकडून कारवाई का केली गेली नाही, असा सवालही त्यांनी केला. जेएनपीटीला न्हावा शेवा बंदर, असेही म्हटले जाते.4 / 11यातच, एबीपी न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे, की 'सूत्रांच्या मते, समीर वानखेडे हे नियमा प्रमाणे दर वर्षी आपल्या विभागाला आपल्या संपत्तीशी संबंधित माहिती देत असतात. यानुसार त्यांच्याकडे, 4 एकर जमीन आहे. ही जमीन महाराष्ट्रातील वाशिम जिल्हायत आहे. (ही कौटुंबीक संपत्ती असून त्यात त्यांचाही वाटा आहे.)5 / 112004 मध्ये वानखेडे यांची आई जाहिदा वानखेडे यांनी समीर यांना 800 चौरस फुटांचे घर दिले, हे घर त्याच्या आई आणि समीर यांच्या नावावर आहे. आई जाहिदा वानखेडे यांच्या नावावर एक फ्लॅट आहे. तो 1999 मध्ये घेतला होता, तोही वानखेडे यांच्या जवळ आहे. हा फ्लॅट सुमारे 700 स्क्वेअर फूट असून मुंबईत आहे.6 / 11समीर वानखेडे यांच्या काकूंचे कँसरने निधन झाले आहे. त्यांना मुले नाहीत. यामुळे, त्यांनी त्यांचे ऑफिस, जे साधारणपणे 1000 स्केअर फूट एवढे आहे. तेही समीर वानखेडे यांच्याकडेच आहे.7 / 11समीर वानखेडे यांचा नवी मुंबईत एक प्लॉट आहे. तो भाड्याने देण्यात आला आहे. हा प्लॉट 1995 मध्ये घेण्यात आला होता. तो साधारणपणे 1100 स्केअर फूट होता.8 / 11समीर वानखेडे यांनी 2016 मध्ये सुमारे 1100 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट खरेदी केला होता. हा फ्लॅट घेण्यासाठी त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी म्हाड येथील फ्लॅट विकला. वडिलांच्या पेन्शनचे पैसेही फ्लॅट खरेदीसाठी वापरले. आईच्या मृत्यूनंतर एलआयसीचे पैसेही मिळाले आणि पगाराचा काही भागही फ्लॅट खरेदीसाठीही वापरला.9 / 11याशिवाय, नवाब मलिकांनी ज्या घड्याळाचा उल्लेख केला आहे, ते घड्याळ समीर यांच्या आईने 2005 साली 55000 रुपयांना खरेदी केले होते आणि समीर वानखेडे यांना भेट म्हणून दिले होते. त्यावेळी समीर वानखेडे यांना पहिली सरकारी नोकरी सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनमध्ये लागली होती. आता राहिला विषय शूज आणि कपड्यांचा तर, समीर वानखेडे ही सर्व खरेदी अंधेरी लोखंडवालाच्या सामान्य दुकानातून करतात. 10 / 11कोन होत्या जहिदा वानखेडे? जाहिदा वानखेडे या समीर वानखेडे यांच्या आई होत्या. 2015 मध्ये त्यांचे निधन झाले. जाहिदा या व्यावसायिक होत्या आणि त्यांचा स्क्रॅप ट्रेडचा बिझनेस होता. त्यांची आई दुर्गा नावाने एनजीओ देखील चालवत, याशिवाय त्या अनाथालयही चालवायच्या.11 / 11समीर वानखेडे यांचे आजोबा, म्हणजेच जाहिदा वानखेडे यांचे वडील हरियाणातील मुरथल येथील होते आणि तेही रॉयल परिवारातील होते. समीर वानखेडे यांची आजी, म्हणजे जाहिदा यांची आई सूरतच्या होत्या. त्याही एका संपन्न कुटुंबातील होत्या.