By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 11:22 IST
1 / 11बऱ्याचदा तुमच्या ओळखीच्या किंवा बातम्यांमधून पती-पत्नीने घटस्फोट घेतला की पत्नीला पोटगी द्यावी लागते हे ऐकले असेल. म्हणजे पती त्याच्या विभक्त पत्नीला महिन्याचा खर्च भागविण्यासाठी काही रक्कम देतो. हा खर्च सर्वस्वी पतीच्या उत्पन्नावर आणि पत्नीच्या जीवनशैलीवर अवलंबून असतो. 2 / 11बऱ्याचदा पत्नीला पोटगी द्यावी लागू नये म्हणून पती आपण कमवत नाही किंवा पत्नी कमावती आहे हे दाखवितो. आजकाल बऱ्याच घरातील महिला देखील नोकरी, व्यवसाय करून आपल्या पायावर उभ्या आहेत. यामुळे महिलांचे उत्पन्न असेल तर महिलांना पोटगी मिळण्यास अडचणी येतात. मग त्या मुलांच्या संगोपनाचा खर्च मागू शकतात. 3 / 11परंतू आता मुंबई उच्च न्यायालयाने पतीलाही कमावत्या पत्नीकडून पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचा निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने घटस्फोटित पतीला पत्नीने दरमहा भरणपोषण देण्याचे आदेश दिले आहेत. तुम्ही विचार करत असाल असे कसे झाले? 4 / 1117 एप्रिल 1992 रोजी लग्न झाले होते. यानंतर पत्नीने क्रूरतेचे कारण देत पतीकडून घटस्फोट मागितला. 2015 साली नांदेडच्या न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला होता. पतीने कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केली आणि पत्नीकडून दरमहा 15,000 रुपये कायमस्वरूपी भरपाई देण्याची मागणी केली.5 / 11आपल्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याचे पतीने सांगितले. त्याचबरोबर पत्नीने एमए आणि बीएडपर्यंत शिक्षण घेतले असून ती शाळेत शिक्षिका आहे. मी पत्नीला शिकवले आहे. ती दरमहा 30 हजार रुपये कमावते. माझी तब्येत ठीक नसते. त्यामुळे कोणते काम किंवा नोकरी करू शकत नाही. घरातील सर्व सामान व संपत्तीही पत्नीकडे आहे, असा दावा पतीने केला होता. 6 / 11तर पत्नीने त्याचा दावा फेटाळून लावण्यासाठी, त्याचे किराणा दुकान असल्याचे म्हटले. त्यांच्याकडे ऑटो रिक्षाही आहे. रिक्षा भाड्याने घेऊन पैसे कमावतो. दोघांनाही एक मुलगी असून ती आईवर अवलंबून आहे.7 / 11दोन्ही पक्षांचे उत्पन्न आणि मालमत्ता पाहता न्यायालयाने पत्नीला दरमहा पतीला तीन हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले. आता असे कसे झाले? पती पत्नीला पोटगी देतो हे ऐकले होते, आता पत्नी कशी काय पोटगी देणार...चला जाणून घेऊयात अटी आणि शर्थी...8 / 11जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला अन्न, कपडे, घर, शिक्षण आणि वैद्यकीय या मूलभूत गरजांसाठी आर्थिक सहाय्य करते तेव्हा त्याला देखभाल म्हणतात. जर पती-पत्नीमधील संबंध बिघडले असतील आणि दोघेही कायदेशीररित्या एकमेकांसोबत राहत नसतील, तर पती किंवा पत्नीपैकी कोणीही कोर्टात भरणपोषणासाठी अर्ज करू शकतात.9 / 11शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या कमकुवत पती जो पैसे कमवू शकत नाही. जर पतीने पत्नीकडून भरणपोषणाचा दावा केला असेल तर त्याला न्यायालयात सिद्ध करावे लागेल की तो शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या कमावण्यास सक्षम नाही आणि पत्नी कमावते.10 / 11हिंदू विवाह कायदा 1955 नुसार पती-पत्नी दोघेही एकमेकांकडे भरणपोषणाची मागणी करू शकतात. कलम 24- जर पती-पत्नीचा खटला न्यायालयात चालू असेल आणि कामकाज चालू असेल, तर न्यायालयाला असे आढळून आले की पती त्याच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. तेव्हा न्यायालय कमावत्या पत्नीला त्याला पैसे देण्यास सांगू शकते. 11 / 11कलम २५ - पतीला कायमस्वरूपी भरणपोषण आणि पोटगी मिळण्याचा नियम समाविष्ट आहे. परंतू जर काही महिन्यांनी पती कमवू लागला तर न्यायालय ही पोटगी रद्द करू शकते. याबाबतचे वृत्त दैनिक भास्करने दिली आहे.