Maharashtra Election 2019: जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या प्रचार सभेतील 5 ठळक मुद्दे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 13:33 IST
1 / 5महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली जाहीर सभा जळगावात पार पडली. यामध्ये त्यांनी विविध मुद्द्यावरुन विरोधकांना टीकेचं लक्ष्य केलं. 5 ऑगस्टला तुमच्या सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन भाजपा आणि एनडीए सरकारने देशात ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या 70 वर्षापासून विकासापासून वंचित असलेल्या काश्मिरी लोकांना न्याय मिळाला. 2 / 5जम्मू काश्मीर आणि लडाख हा फक्त जमिनीचा तुकडा नसून भारतमातेचं मस्तक आहे. तेथील मातीचा प्रत्येक कण भारताला मजबूत करतो. 3 / 5जर विरोधकांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आगामी निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कलम 370 पुन्हा लागू करु असं घोषित करावं असं आव्हान नरेंद्र मोदींनी भाषणात केलं. 4 / 5थकलेले पक्ष एकमेकांचा आधार बनू शकतात पण महाराष्ट्रातील तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही असा टोला मोदींनी काँग्रेस-राष्ट्रवादीला लगावला. 5 / 52022 पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येकाला घर, पाणी देण्याचा संकल्प भाजपाचा आहे, जल जीवन मिशनसाठी साडेतीन लाख कोटी रुपये खर्च करणार असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं.