लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
ठाणे : वसंतराव डावखरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 20:44 IST
1 / 8विधानपरिषदेचे माजी उप सभापती वसंतराव डावखरे यांच्या पार्थिवावर आज दुपारी येथील जवाहरबाग स्मशानभूमीत शासकीय इतमामामात अंत्यसंस्कार करण्यात आले.2 / 8यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , विधानपरिषदेचे उप सभापती माणिकराव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण तसेच राजकीय नेते, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. 3 / 8यावेळी जगन्मित्र हरपला अशा भावपूर्ण शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 4 / 8स्मशानभूमीत त्यांचे पुत्र प्रबोध आणि आमदार निरंजन डावखरे यांनी विधिवत त्यांच्या पार्थिवास अग्नी दिला. 5 / 8यावेळी पोलीस दलातील जवानांनी हवेत गोळीबाराच्या फैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना दिली. 6 / 8दरम्यान आज सकाळी स्व. वसंतराव डावखरे यांचे पार्थिव मुंबईहून ठाण्यातील हरिनिवास भागातील गिरीराज हाईट्स येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. 7 / 8यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी पुष्प वाहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.8 / 8यावेळी अनेक राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, ठाण्यातील आमदार, लोकप्रतिनिधी यांनी एकच गर्दी केली होती. यानंतर त्यांची अंत्ययात्रा प्रमुख मार्गावरून निघून स्मशानभूमीत पोहोचली.