शिंदे की ठाकरे, खरी शिवसेना कुणाची?; C-Voter च्या सर्व्हेत धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 16:10 IST
1 / 10महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतर शिंदे गट आणि भाजपा यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले. आम्हीच शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे गटाकडून सातत्याने केला जात आहे. 2 / 10एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला विधानसभेतील ५० आमदारांनी आणि लोकसभेतील १२ शिवसेना खासदारांनी समर्थन दिले आहे. दोन तृतीयांश बहुमत शिंदे यांच्याकडे असल्याने गटनेता, प्रतोद बदलून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना धक्का दिला.3 / 10एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आमदार, खासदार, नगरसेवकांसह स्थानिक पातळीवरील पदाधिकारीही शिंदे गटात उघडपणे सहभागी होत आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न उभा राहिला आहे. 4 / 10याबाबत सी-वोटर इंडिया ट्रॅकरनं लोकांची मते जाणून घेतली. देशपातळीवर हा सर्व्हे घेण्यात आला. या सर्व्हेत शिवसेनेतील सध्या चित्राबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यात एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे नवे प्रमुख म्हणून उभारी घेत असल्याचं मत बहुतांश लोकांनी व्यक्त केले. 5 / 10५४ टक्के लोकांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी खऱ्या अर्थाने शिवसेनेत यशस्वीरित्या नेतृत्व प्रस्थापित केले आहे. तर ४६ टक्के लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने मत नोंदवले असून बंडावर नाराजी व्यक्त केली आहे. 6 / 10शिंदे यांनी ठाकरे यांची जागा घेतल्याचे मोठ्या संख्येने लोकांचे मत आहे. सर्वेक्षणादरम्यान विरोधी पक्ष आणि एनडीए या दोन्ही मतदारांची शिवसेनेच्या नेतृत्वाबाबतची मते भिन्न होती. दोन्ही गटातील मोठ्या वर्गाने शिंदे यांच्या समर्थनार्थ प्रतिसाद दिला. 7 / 10सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, ५९ टक्के विरोधी मतदार आणि ५१ टक्के एनडीए समर्थकांचा असा विश्वास आहे की एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची जागा घेतली आहे हे आमदार, खासदारांच्या पाठिंब्यावरून दिसून येते. 8 / 10शहरी लोकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेवर वर्चस्व कायम आहे. सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून पुढे असे दिसून आले की ६१ टक्के ग्रामीण मतदारांनी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर पकड मजबूत केली आहे असं सांगितले. 9 / 10तर शहरी मतदारांचा या विषयावर वेगळा विचार आहे. सर्वेक्षणादरम्यान, ५२ टक्के शहरी मतदारांनी सांगितले की उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेवर वर्चस्व कायम आहे, तर ४८ टक्के शहरी मतदारांनी एकनाथ शिंदे हे पक्षाचे नवे नेते बनल्याचे सांगितले.10 / 10दरम्यान, एकनाथ शिंदे गटाने लोकसभेत राहुल शेवाळे यांना गटनेते, भावना गवळी यांना मुख्य प्रतोदपदी नेमलं आहे. त्याला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली. आणि विधानसभेत शिंदे गटनेते आणि मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांच्या निवडीला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे.