शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

तुळजाभवानी देवी मंदिराच्या गाभाऱ्यातील शिळांना पडल्या भेगा; चिंताजनक PHOTOS आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 13:05 IST

1 / 8
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तुळजापूर येथे वास्तव्य आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे.
2 / 8
तुळजापूरची देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आराध्य देवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे.
3 / 8
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देउन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला, असं म्हटलं जातं.
4 / 8
महाराष्ट्राची कुलस्वामिनी अशी ओळख असलेल्या तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवी मंदिर गाभाऱ्यातील तीन शिळांना भेगा पडल्या आहेत. हा प्रकार जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीत समोर आला. पाहणीसाठी पुरातत्व विभागाची टीम येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
5 / 8
मंदिरात सध्या पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली विकासकामे सुरू आहेत. काही कामे नूतनीकरणाची आहेत. ज्या ठिकाणी दगडी बांधकाम झाले आहे, ते त्याचप्रकारे राहावे व ते पूर्वीप्रमाणे दिसावे, यादृष्टीने पुरातत्व खात्याचे प्रयत्न आहेत. सिंहासन गाभाऱ्याचे नूतनीकरण झाले.
6 / 8
जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, 'पुरातत्व'च्या सहायक संचालक जया वाहणे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी या कामाची पाहणी केली.
7 / 8
शिळांना पडलेल्या या भेगा कुठपर्यंत आहेत? आणखी किती शिळांना भेगा असतील? याची पाहणी करण्यासाठी आता पुरातत्व विभागातील तज्ज्ञांच्या पथकास पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
8 / 8
पुरातत्व विभागातील तज्ज्ञांच्या पथकाने दिलेला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.
टॅग्स :dharashivधाराशिवTempleमंदिर