भीमा-कोरेगाव हिंसाचाराचं लोण मुंबईत, अनेक ठिकाणी आंदोलकांचा रास्ता रोको
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 23:34 IST
1 / 5भीमा-कोरेगाव येथे संघर्षाचे लोण राज्याच्या वेगवेगळ्या भागात पसरले असून मुंबईतही हिंसक पडसाद उमटले आहेत. 2 / 5चेंबूर, गोवंडी येथे रेल रोको झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. 3 / 5मुंबईत आज वेगवेगळया भागात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. चेंबूर, सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक रोखून धरली होती.4 / 5चेंबूर, मुलुंड, कुर्ला, गोवंडी परिसरात मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दल आणि 400 अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. 5 / 5चेंबूर येथील अमर महाल, घाटकोपर इथे दगडफेकीच्या घटना घडल्या. भीमा-कोरेगाव हिंसाचारामुळे अहमदनगर, औरंगाबाद येथे जाणारी बससेवा बंद करण्यात आली.