By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 16:11 IST
1 / 10पालकांना मुलांच्या आजारांची खूप काळजी असते. पण, अनेकदा होतं असं की, आजार काहीतरी असतो आणि पालक दुसऱ्याच काही उपचारावर खर्च करत राहतात. नंतर जेव्हा खऱ्या रोगाचे निदान होते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. 2 / 10आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की, कॅन्सर हा असाच एक जीवघेणा आजार आहे, ज्यावर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.3 / 10कर्करोगाची प्रकरणे केवळ प्रौढांमध्येच नाही, तर लहान मुलांमध्येही आढळू लागली आहेत. याचे अनेक रुग्ण सध्या सोलापुरात उपचार घेत असल्याची माहिती कॅन्सरतज्ज्ञांनी दिली आहे.4 / 10आपल्याकडे लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे निश्चितच बाळांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे कॅन्सरच्या रुग्णांचाही आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. 5 / 10लहान मुलांना कॅन्सर झाल्यास त्याला विशेष उपचाराची गरज आहे. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स, लहान मुलांवर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर्स आता सोलापुरात उपलब्ध होऊ लागले आहेत. 6 / 10इंडियन कॅन्सर सोसायटी, मुंबई व अन्य एका खासगी ट्रस्टसोबत सोलापुरातील काही हॉस्पिटलने सोबत काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लहान मुलांच्या कॅन्सरवर सोलापुरातच उपचार होत आहेत, अन्य शहरात जाण्याची आता गरज उरली नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. 7 / 10लवकर निदान झाल्यास कर्करोगावर मात शक्य: याबाबत कॅन्सरतज्ज्ञ डॉ. फहीम गोलीवाले यांनी सांगितले की, ० ते १४ वयोगटातील लहान मुलांना कॅन्सर हा आजार होऊ लागला आहे. सोलापुरात असे रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. लहान मुलांना कॅन्सर होण्याचे कारण अद्याप तरी समोर आले नाही. शिवाय प्रतिबंधात्मक उपाय करणं अवघड आहे. पालकांनी लहान मुलांच्या आजारांकडे दुर्लक्ष करू नये, उपचार घ्यावेत. बाळ उपचाराला चांगला प्रतिसाद देतात, त्यामुळे ते बरे होतात.8 / 10कॅन्सर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता २० टक्क्यांपर्यंत आले आहे.9 / 10अत्याधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञ डॉक्टर्स, जनजागृती, प्रचार, प्रसार याशिवाय विशेष उपचार पद्धतीमुळे रुग्ण लवकर बरा होत आहे. मेडिकल हब म्हणून ओळखल्या जात असलेल्या सोलापुरातील शासकीय रुग्णालयातही कॅन्सरवर उपचार होत आहेत.10 / 10मुलांना कोणत्या प्रकारचा होतो कॅन्सर? ब्लड कॅन्सर - डोळ्यांचा कॅन्सर, किडनीचा कॅन्सर, न्युटोप्लॅटटुमा कॅन्सर