शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

killari earthquake : 25 वर्षांपूर्वी झालेल्या किल्लारी भूकंपाच्या आठवणींनी आजही महाराष्ट्र हादरतो!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 12:37 PM

1 / 6
आजपासून ठिक 25 वर्षांपूर्वी लातूरमध्ये झालेल्या भूकंपाच्या आठवणीने आजही महाराष्ट्र हादरतो. आजही 30 सप्टेंबर 1993च्या पहाटेचा विचारही लातूरकरांच्या काळजाचा ठोका चुकवतो.
2 / 6
1993मध्ये 30 सप्टेंबरला लातूरमधील किल्लारीत झालेल्या भूकंपाने संपूर्ण गाव उध्वस्त झालं होतं. यामध्ये 10 हजार लोक मृत्यूमुखी पडली होती तर जवळपास 30 हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते.
3 / 6
29 सप्टेंबर 1993च्या अनंतर चतुर्दशीच्या दिवशी विघ्नहर्त्या गणरायाला निरोप देऊन संपूर्ण गाव झोपेत असताना पहाटे तीन वाजून 56 मिनिटांनी भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता 6.03 रिश्टर स्केल्या धक्क्यांनी अनेक गावं जमिनदोस्त झाली.
4 / 6
किल्लारीमध्ये झालेला भूकंप म्हणजे भारतातील सर्वात विनाशकारी भूकंपांपैकी एक होता. तर राज्यातील सर्वात मोठा नैसर्गिक प्रकोप होता.
5 / 6
आजही या दिवसाच्या जखमा अजून भरून निघालेल्या नाहीत. त्यामुळे या दिवशी संपूर्ण गावामध्ये बंद पाळण्यात येतो.
6 / 6
या भूकंपामुळे 52 गावं जमिनदोस्त झाली होती. आजही या दिवसाच्या आठवणींनी गावकऱ्यांच्या अंगावर काटा येतो.
टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपMaharashtraमहाराष्ट्र