'या' ठिकाणी आहे उकळत्या पाण्याचा तलाव, यात पडून तरुणाची झाली होती अशी अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 20:47 IST
1 / 7 नवी दिल्ली: उन्हाळ्यात गरमीपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण पोहायला जातात. पण, जर तुम्हाला समजलं की, एखाद्या तलावामध्ये उकळतं पाणी आहे, तर तुम्ही त्यात जाणार का ?2 / 7 अमेरिकेतील यलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये असाच एक तलाव आहे. या तलावाचं पाणी लाव्हाप्रमाणं उकळत राहतं आणि त्यात उतरल्यावर मृत्यू होऊ शकतो.3 / 7 अमेरिकनं सरकारनं या तलावाजवळ जायला बंदी घातलेली आहे. काही दिवसांपूर्वी या तलावाजवळ गेल्यामुळे एका महिलेला तुरुंगाची हवा खावी लागली होती.4 / 7 अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, काही लोक नियम मोडून तलावाजवळ जातात आणि अशा लोकांना पाहून इतर पर्यटकदेखील येथे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी जाऊ शकतात.5 / 7 अमेरिकेतील यलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये असलेल्या या तलावाचं नाव नॉरिस गीझर बेसिन आहे. आतापर्यंत 20 जण यात पडून गंभीररित्या भाजले आहेत. 6 / 7 या तलावात उकळत्या पाण्यासह खूप चिखल असल्यामुळे यात पडलेल्या व्यक्तीला लवकर बाहेर येता येत नाही, आणि त्यात त्याचा मृत्यू होऊ शकतो.7 / 72016 मध्ये कॉलिन स्कॉट या 23 वर्षीय पर्यटकाचा याच तलावात पडून मृत्यू झाला होता. 100 अंश सेल्सिअस गरम पाणी असलेल्या या तलावात पडून कोलिनचे शरीर वितळून गेले होते.