शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बंगला नाही, फाईव्ह स्टार हॉटेलही नाही ही आहेत जगातील सर्वात आलिशान कारागृह...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 21:03 IST

1 / 10
ओस्लोच्या दक्षिणेस सुमारे ७५ किलोमीटरवर बोस्टोय तुरूंग आहे. नॉर्वे मधील बस्टे बेट वर हे सुरक्षा तुरूंग आहे. हे जेल २.६ चौरस किलोमीटरवर पसरेलेले आहे.
2 / 10
स्कॉटलंडच्या वेस्ट लोथिअनमधील अ‍ॅडीवेल गावाजवळ एचएमपी एडिवेल हे तुरुंग आहे. एचएमपी एडिवेल हे सोडेक्सो जस्टिस सर्व्हिसेस या खासगी कंपनीद्वारे चालविले जाते. या कंपनीने स्कॉटिश कारागृह सेवेसाठी करार केला
3 / 10
ओटागो सुधार गृह न्यूझीलंडच्या दक्षिण बेटातील मिल्टन जवळ आहे. ओटागो आपल्या कैद्यांना आरामदायक खोल्या उपलब्ध करुन देते. तसेच त्यांचा कौशल्यविकास व्हावा म्हणून तांत्रिक प्रशिक्षणही देते.
4 / 10
जस्टिस सेंटर लिओबेन हे ऑस्ट्रियाच्या स्टायरियामधील एक कोर्ट आणि तुरूंगातील संकुल आहे. या कारागृहात प्रत्येक कैद्याला खासगी बाथरूम आणि स्वयंपाकघर, तसेच एक टीव्ही अशाा सुविधा असलेला एक सेल दिला जातो. तसेच कारागृहात सुसज्ज जिम, बास्केटबॉल कोर्ट आणि मैदानी मनोरंजन खेळही उपलब्ध आहेत
5 / 10
स्पेन देशात अरांजुझ कारागृह आहे. या कारागृहाला 'फॅमिली प्रीमियर जेल' असेही म्हणतात. हे कैद्यांना तुरुंगात कुटुंबातील सदस्यांसह राहू देतात.
6 / 10
एचएम जेल जेल बर्विन हे वेल्समध्ये आहे. या कारागृहात कैद्यांना आठवड्यातून जेवणाची ऑर्डर देण्यासाठी, भेटीची व्यवस्था करण्यासाठ, खरेदीसाठी आणि त्यांच्या अभ्यासासाठी लॅपटॉप दिला जातो.
7 / 10
जेव्हीए फुल्स्बुट्टेल जेल हे जर्मनीमधील हॅम्बुर्ग येथील तुरूंग आहे. त्यात प्रशस्त खोल्या आहेत ज्यात पलंग, शॉवर आणि शौचालय याची सुविधा आहे. तसेच भरपूर नैसर्गिक प्रकाश येईल अशा खोल्या आहेत
8 / 10
सोललेंटुना जेल हे स्वीडनमधील सोललेंटुना येथील क कारागृह आहे. येथे कैदी जेवण बनवू शकतात, टीव्ही पाहु शकतात व व्यायामही करु शकतात.
9 / 10
हॅल्डेन तुरुंग हे नॉर्वेच्या हॅल्डनमधील तुरूंग आहे. यात तीन मुख्य युनिट्स आहेत. येथे स्किल्ड बिल्डिंग क्लासेस, रेकॉर्डिंग रूममध्ये टीव्ही शो, चित्रपट आणि व्हिडिओ गेम्स, शूटिंग हूप्स, पूर्णपणे सुसज्ज जिम आणि म्युझिक रेकॉर्डिंग सुविधा उपलब्ध आहेत.
10 / 10
पोंडोक बांबू कारागृह इंडोनेशियाच्या पूर्व जकार्ता येथील महिला कारागृह आहे. वातानुकूलित सुविधा, रेफ्रिजरेटरपासून ते करोके मशीन आणि नेल सलूनपर्यंतच्या सर्व गोष्टींनी हे कारागृह पूर्णपणे सुसज्ज आहे. बागांमध्ये शिल्पांनी भरलेल्या या कॉम्प्लेक्समधील कैद्यांना सौंदर्य उपचार आणि मनोरंजन वर्गही उपलब्ध आहेत.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके