शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'हे' आहे जगातील सगळ्यात महागडं चीज, इतक्या किंमतीत घेऊ शकाल एक आलिशान बंगला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 15:10 IST

1 / 6
Worlds most expensive cheese: चीज खाणं अनेकांना आवडतं. आपणंही चीज खाण्याचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी धक्कादायक ठरू शकते. स्पेनचं ब्लू चीजचा वर्ल्ड रेकॉर्ड बनवत ३६ लाख रूपयात लिलाव करण्यात आला. हे चिज २.३ किलो वजनी आहे. हा लिलाव स्पेनच्या आस्तुरिअस भागात झाला, इथे दरवर्षी काब्रलेस चीज कॉम्पिटिशनचं आयोजन केलं जातं.
2 / 6
ही काही सामान्य चीज नाही. काब्रलेस नावाचं हे चीज गायीच्या दुधापासून तयार केलं जातं आणि हे चीज स्पेनच्या पाइकॉस दे यूरोप पर्वत श्रृंखलेतील एका गुहा लॉस मजॉस (Los Mazos) मध्ये जवळपास १० महिने ठेवलं जातं. गुहेतील थंड हवा आणि ओलाव्यानं चीजची टेस्ट वेगळी लागते आणि त्यात हिरव्या-निळ्या रंगाच्या रेषा दिसू लागतात.
3 / 6
हे चीज Ángel Díaz Herrero नावाच्या एका फॅक्टरीनं तयार केलं. इथे आजही चीज बनवण्याची पारंपारिक पद्धत जिवंत आहे. १५ सहभागी चीजपैकी हे चीज विजेता ठरलं. लिलावातून हे चीज Iván Suárez रेस्टॉरन्टच्या मालकांना खरेदी केलं. हे रेस्टॉरन्ट लागोपाठ पाचव्यांदा सगळ्यात जास्त बोली लावणारं ठरलं.
4 / 6
काब्रलेस चीज बनवण्याची पद्धत पूर्ण हातानं केली जाते. गायीचं कच्च दूध कपड्यांमध्ये बांधून गुहेतपर्यंत आणलं जातं. इथे चीज हवा, दगड आणि गुहेच्या मायक्रोब्सच्या संपर्कात हळूहळू तयार होतं. बाजारातील कोणतंही चीज टेस्टबाबत या चीजसोबत स्पर्धा करू शकत नाही.
5 / 6
चीजची किंमत केवळ याच्या टेस्टमध्ये नाही तर यासाठी लागणारा वेळ, मेहनत आणि परंपरा यासाठीही लावली जाते. हे टेस्टी तर असतंच, सोबतच यात कॅल्शिअम भरपूर असतं आणि पचनासाठी फायदेशीर असतं.
6 / 6
अलिकडे भारतातही आत चीज मेकर तयार झाले आहेत. जे चांगल्या क्वालिटीवर फोकस करतात. बरेच लोक घरीच चीज तयार करतात.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स