By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 12:45 IST
1 / 7जगात समुद्र सपाटीपासून सर्वाधिक जास्त उंचीवर असणारे शहर दक्षिण अमेरिकेतील पेरूमध्ये आहे. 2 / 7ला रिनकोनाडा नावाचे पेरूमध्ये शहर आहे. 3 / 7पेरूमधील अँडीज पर्वतावर पाच किलोमीटर उंचीपर्यंत म्हणजे समुद्र सपाटीपासून 5100 मीटर उंचीवर रिनकोनाडा शहर आहे.4 / 7दक्षिण अमेरिकेत असूनही ला रिनकोनाडा शहरात प्रचंड थंडी असते. येथील तापमान सरासरी 1.2 डिग्रीपर्यंत असते.5 / 7तसेच, या शहरात 30 हजारहून अधिक लोक वास्तव्यास आहेत.6 / 7विशेष म्हणजे, याठिकाणी कोणताही कर नाही किंवा स्थानिक सरकार नाही. त्यामुळे पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध नाहीत. 7 / 7येथील पर्वतात सोन्याच्या खाणी आहेत, मात्र येथील कंपन्या कायदेशीर उत्खनन करत नाही. तर बऱ्यापैकी अवैध उत्खनन करण्यात येते. तसेच, येथील पुरुषमंडळी खाणीत काम करतात. तर महिला साहित्य विक्रीचे काम करतात.