सगळ्यात अजब गाडी जी कधी धावते रस्त्यावर तर कधी रेल्वे ट्रॅकवर, १५ सेकंदात बदलते आपलं रूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 16:17 IST
1 / 7Weird Train in World: आपण काही हॉलिवूड सिनेमांमध्ये पाहिलं असेल की, हिरोची कार अचानक चेन्ज होते आणि रेल्वे ट्रॅकवरही रेल्वेसारखी धावू लागते. 'जेम्स बॉन्ड' सिरीजच्या एका सिनेमातही अशी कार दाखवली आहे. पण जरा विचार करा की, एखादी बस आपल्याला घरासमोरून पिक अप करेल आणि पुढे जाऊन रेल्वे ट्रॅकवर धावू लागेल. खरं तर हे एखाद्या कहाणीसारखंच वाटतं. पण अशी एक बस कम ट्रेन आहे. जी रस्त्यावरही धावते आणि नंतर रेल्वे ट्रॅकवरही सुसाट धावते. 2 / 7जपानमध्ये धावणारी DMV बस आहे की ट्रेन असा प्रश्न इतरांप्रमाणे आपल्यालाही पडेल. कारण ही रस्त्यावर धावतानाही दिसते आणि नंतर आपलं रूप बदलून ट्रेन बनते. जपानच्या कायो शहरात धावणारी ही गाडी बस होते, तर कधी ट्रेन बनून धावते. 3 / 7ड्यूल मोड व्हेईकल म्हणजे DMV दिसायला एखाद्या मिनी बससारखी दिसते. जी फक्त १५ सेकंदात स्वत:ला ट्रेनमध्ये बदलते. डिसेंबर २०२१ पासून जपानमध्ये चालणाऱ्या DMV ट्रेनमध्ये रबराचे टायर लागलेले आहेत, ज्यांच्या मदतीने ती रस्त्यावर धावते. जेव्हा ट्रॅकवर धावायचं असतं तेव्हा रबरचे टायर जाऊन स्टीलची चाकं येतात. 4 / 7DMV ची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे अगदी काही सेकंदात आपलं रूप बदलणं. बसची ट्रेन आणि ट्रेनची बस होण्यासाठी केवळ १५ सेकंदाची वेळ लागते. १५ सेकंदात रेल्वेची चाकं बाहेर येतात आणि बस ट्रेन बनून ट्रॅकवर धावू लागते. 5 / 7या ट्रेनच्या स्पीडबाबत सांगायचं तर रस्त्यावर धावताना स्पीड ६० किमी प्रति तास इतका असतो, तर ट्रॅकवर हीचा स्पीड १०० किमी प्रति तास इतका असतो. म्हणजे स्पीडमध्येही ही ट्रेन कमी नाही. यात एकावेळी २१ ते २३ लोक बसून प्रवास करू शकतात. 6 / 7या खास बस कम ट्रेनमध्ये डीझेल इंजिन लावण्यात आलं आहे २०२१ पासून ही जपानच्या Shikoku Island वर Kochi ते Tokushima Prefecture दरम्यान प्रवास करत आहे. 7 / 7या DMV चा मालकी हक्क Asa Coast Railway नावाच्या पब्लिक रेल्वे कंपनीकडे आहे. DMV रोड आणि रेल्वे ट्रॅक धावते. ज्यामुळे दुर्गम भागातील आणइ सुंदर भागातील प्रवास सोपा होतो.