हे आहे जगातलं सगळ्यात महागडं नेल पॉलिश, याच्या किंमतीत खरेदी करू शकता चार फॉर्च्यूनर कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 13:30 IST
1 / 6मुलींना एकापेक्षा एक महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्स वापरण्याची आवड असते आणि त्यामुळे ब्युटी प्रॉडक्ट्स तयार करणाऱ्या कंपन्या सतत नवनवीन प्रॉडक्ट्स लॉन्च करत असतात.2 / 6मीडिया रिपोर्ट्सनुसार, जगातल्या सगळ्यात महागड्या नेल पॉलिशबाबत सांगायचं तर याची किंमत 2.5 लाख अमेरिकन डॉलर म्हणजे साधारण 2.05 कोटी रूपये इतकी आहे. याची किंमत वाचून भलेभले हैराण झालेत.3 / 6जगातल्या सगळ्यात महागड्या नेल पॉलिशचं नाव अजाटूर (Azature) आहे. जे लॉस एंजेलिसचा एका डिझायनर Azature Pogosian ने तयार केली आहे.4 / 6Azature Pogosian ने याआधीही नेल पॉलिश तयार केले आहेत. पण त्यांच्याद्वारे तयार केलेली ब्लॅक कलरची अजाटुर (Azature) नेल पॉलिश जगात सगळ्यात महागडी नेल पॉलिश आहे.5 / 6अजाटुर ब्लॅक नेल पॉलिश तयार करण्यासाठी 267 कॅरेटच्या ब्लॅक डायमंडचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळेच याची किंमत साधारण 2 कोटी रूपये इतकी आहे.6 / 6अजाटुर (Azature) च्या एका ब्लॅक पॉलिशच्या किंमतीत 4 फॉर्च्यूनर कार खरेदी केल्या जाऊ शकतात. या कारची किंम साधारण 50 लाख रूपये असते. रिपोर्ट्सनुसार, ही नेल पॉलिश इतकी महागडी आहे की, आतापर्यंत केवळ 25 लोकच ही खरेदी करू शकले आहेत.