शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अद्भूत अविष्कार! इथं नदी नाही तरीही 'या' ठिकाणी पूलावर चालतं जहाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 14:30 IST

1 / 5
जर्मनी हा असा देश आहे की, येथील इंजिनीअर अनोख्या पद्धतीने नवनवीन गोष्ट राबविण्यात प्रसिद्ध आहे. मैग्डेबर्ग शहरातही असाच एक अद्भूत नजारा पाहायला मिळतो. येथे बांधण्यात आलेल्या पुलावरुन वाहनं नाही तर जहाज चालतं.
2 / 5
याठिकाणी असणाऱ्या एल्बे नदीवर बनविण्यात आलेल्या पूलाला पाहून वाटतं की नदीवर नदी वाहू लागली आहे. या ब्रीजला मैग्डेबर्ग वॉटर ब्रीज नावाने ओळखलं जातं.
3 / 5
या पुलाच्या माध्यमातून मोठे-छोटे व्यावसायिक या जहाजांचा वापर पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी येण्याजाण्यासाठी वापरतात.
4 / 5
या पुलाचं बांधकाम २००३ मध्ये झालं आहे. जहाजांची वाहतूक करण्यासाठी जगातलं सर्वाधिक लांब जलसेतू आहे. याची लांबी १ किलोमीटर आहे.
5 / 5
या ब्रीजला बनविण्याची आयडिया ८० वर्षापूर्वी समोर आली होती. त्याचं बांधकाम १९३० मध्ये सुरु होणार होतं. मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर ही कल्पना मागे पडली. १९९७ मध्ये या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली. अन् २००३ मध्ये हे बांधकाम पूर्ण झालं. या प्रकल्पासाठी ३ हजार ५५६ कोटी रुपये खर्च झाला.
टॅग्स :Waterपाणी