शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बापरे! 'या' महिला भिकारीकडे असणाऱ्या पैशात तुम्ही 10 BMW कार सहज खरेदी करु शकता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 20:03 IST

1 / 5
जगातील काही देशात भीक मागणे हा गुन्हा आहे, मात्र तरीही भिकाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. अशातच एका महिला भिकाऱ्याची बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय, या भिकारी महिलेच्या खात्यातील रक्कम पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
2 / 5
ही महिला भिकारी लेबनान येथे राहणारी आहे, तीचं नाव वाफा मोहम्मद अवद आहे. तिच्या बँक अकाऊंटमध्ये ६.३७ कोटी रुपये आहेत. हा प्रकार तेव्हा समोर आला ज्यावेळी ही महिला भिकारी एका बँकेतून रक्कम दुसऱ्या बँकेत जमा करत होती.
3 / 5
मीडिया रिपोर्टनुसार ज्यावेळी महिलेने बँकेत पैसे ट्रान्सफर करण्याची स्लीप भरली त्यावेळी ती स्लीप पाहून बँक कर्मचारी चकीत झाला. या महिलेकडे इतकी रक्कम आली यात तो चक्रावून गेला.
4 / 5
महिलेने दिलेले दोन चेक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात ३० सप्टेंबर २०१९ तारखेचा हा चेक आहे. सिदोनमधील एका प्रसिद्ध हॉस्पिटलबाहेर ही महिला भिकारी भीक मागण्यासाठी दिवसभर बसते.
5 / 5
गल्फ न्यूजच्या रिपोर्टनुसार हॉस्पिटलच्या नर्सने सांगितले की, ही महिला हॉस्पिटलच्या गेटवर दिवसभर भीक मागते. जवळपास १० वर्षापासून ती भीक मागत आहे.
टॅग्स :bankबँक